Lok Sabha elections Phase 4 : कोल्हे, दानवे, धंगेकर, पंकजा, रक्षा खडसे या दिग्गजांचं भवितव्य आज इव्हिएममध्ये होणार बंद

18 व्या लोकसभेसाठी मतदान सुरु आहे. उन्हाचा तडाखा सुरु असतानाही मतदार राजा मतदानाचे कर्तव्य निभावत आहे. लोकसभेच्या मतदानाचे तीन टप्पे यशस्वी पार पडले असून आज,13 मे रोजी चौथा टप्प्यातील मतदान सुरु झालं आहे. महाराष्ट्रातील 11 जागांवर मतदान होणार आहे. दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादीत टक्कर होत आहे.

Lok Sabha elections Phase 4 : कोल्हे, दानवे, धंगेकर, पंकजा, रक्षा खडसे या दिग्गजांचं भवितव्य आज इव्हिएममध्ये होणार बंद
Lok Sabha elections Phase 4 Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: May 13, 2024 | 7:59 AM

लोकसभा निवडणूका 2024 चा ज्वर चांगलाच वाढला आहे. एकमेकांना राजकीय पक्ष चिखल फेक करीत असून शिक्षण, महागाई, बेरोजगारी हे मुद्दे बाजूला पडले असून पाकिस्तान, मुस्लीम लांगुनचालन, मंगळसूत्र, वंशभेद आणि रंगभेद अशा मुद्द्यांवर निवडणूक पोहचली आहे. देशभरात निवडणूकीचे तीन टप्पे पार पडले आहेत. आज (13 मे) लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदानास सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रात एकूण 11 जागांवर या तिसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. या निवडणूकीत कुठे पवार विरोधात पवार तर कुठे शिंदे विरोधात ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अनेक दिग्गजांचं भवितव्य आज इव्हिएममध्ये बंद होणार आहे. नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, नगर, शिर्डी आणि बीड अशा अकरा जागांवर मतदान होणार आहे.  त्यातील काही महत्वाच्या लढतींचा आढावा…

पुणे –

भाजपाचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध कॉंग्रेसने रविंद्र धंगेकर

लोकसभा मतदार संघात भाजपाने माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि कॉंग्रेसने रविंद्र धंगेकर यांच्या मुख्य लढत होत आहे. हा मतदार संघ भाजपाचा बालेकिल्ला आहे. परंतू गेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणूकीत रविंद्र धंगेकर यांनी भाजपाचे नेते हेमंत रासने यांचा धक्कादायकरित्या पराभव केला होता. रविंद्र धंगेकर यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यांच्या शिक्षणावरुन त्यांना सोशल मिडीयात विरोधकांनी ट्रोल देखील केले होते.

बीड –

भाजपाच्या पंकजा मुंडे विरुद्ध शरद गटाचे बजरंग सोनावणे

बीड लोकसभा मतदार संघाकडे राज्यासह देशाचेही लक्ष लागले आहे. भाजपाने प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापून यंदा पंकजा मुंडे यांना संधी दिली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे यांच्याशी त्यांची लढत होणार आहे. मराठा आरक्षणावरून बीड मतदार संघाची निवडणूक चुरशीची झाली आहे. बीडमध्ये मराठा विरुध्द ओबीसी अशी विभागणी झाली आहे. साल 2019 मध्ये प्रीतम मुंडे विरोधात बजरंग सोनावणे अशी लढत झाली होती. त्यावेळी आमदार धनंजय मुंडे यांनी सोनावणे यांच्या बाजूने ताकद लावली होती. यंदा धनंजय महायुतीत आहेत. गेल्यावेळी विरोधात असलेले भाऊ बहिण यंदा एकत्र आहेत. मराठा आंदोलनाचे केंद्र बिंदू ठरलेल्या या लोकसभा मतदार संघात पंकजा मुंडे यांना संघर्ष करावा लागत आहे.

शिरुर –

शरद गटाचे कोल्हे विरुद्ध अजित गटाचे आढळराव

बारामतीनंतर शरद पवार यांच्यासाठी शिरुर मतदार संघाची निवडणूक महत्वाची आहे. शिरुर लोकसभा मतदार संघात यंदा शरद पवार यांच्या गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्याविरोधात अजित पवार गटात आलेले शिवाजीराव आढळराव पाटील गेल्या पराभवाचा वचपा काढणार का? हे कळणार आहे. त्यामुळे ही लढत आता पवार काका विरुद्ध पुतण्या यांच्या प्रतिष्ठेची झालेली आहे. त्यावेळी शिवसेनेत असेलेल्या आणि सलग तीन वेळा खासदार झालेल्या आढळराव पाटील यांचा अखंड राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे यांनी पराभव केला होता. यंदा ठाकरे गट आणि कॉंग्रेसची देखील कोल्हे यांना साथ मिळणार आहे.

छत्रपती संभाजीनगर –

संदिपान भुमरे- चंद्रकांत खैरे – इम्तियाज जलील

छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद ) हा मतदार संघ अखंड शिवसेनेचा बाले किल्ला म्हटला जात होता. परंतू साल 2019 मध्ये येथून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा एआयएमआयएमचे इम्तियाज जलील यांनी अवघ्या 4,500 इतक्या मतांनी पराभव केला. साल 2019 मध्ये एआयएमआयएम आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांची युती झाली होती. त्यावेळी वंचित एक जागा ओवैसी यांना देऊन महाराष्ट्रातील 47 जागा लढवल्या होत्या. मात्र यंदा दोघांमध्ये युती झालेली नाही. यंदा शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आणि महायुतीकडून शिंदे गटाचे पैठणचे आमदार संदिपान भुमरे यांना उतरविले आहे. तर वंचितचे अफसर खान आणि एआयएमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील तसेच अपक्ष म्हणून हर्षवर्धन जाधव देखील उभे आहेत. तरी मुख्य लढत तिरंगी होणार आहे.

जालना –

भाजपाचे रावसाहेब दानवे विरुद्ध कॉंग्रेसचे कल्याण काळे

मराठवाड्यात जालना लोकसभा मतदार संघ चर्तेत आहे. या मतदार संघात भाजपाचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा सामना कॉंग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांच्याशी होणार आहे. गेल्यावेळी 2019 मध्ये कॉंग्रेसच्या विलास औताडे यांचा सवा तीन लाख मतांनी पराभव केला होता. जालनातील सलग सात निवडणूका भाजपा जिंकला आहे. दानवे यांची उमेदवारी दिल्यानंतर चार आठवड्यांनी 10 एप्रिल रोजी काळे यांची उमेदवारी कॉंग्रेसने जाहीर केली होती. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी येथून उभे राहावे अशी मागणी वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. परंतू जरांगे पाटील येथून उभे राहीले नाहीत. मात्र त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या असे पाडा की त्यांच्या सात पिढ्या उभ्या राहील्या नाही पाहीजेत अशी असे आवाहन केले होते.

नगर –

भाजपाचे सुजय विखे-पाटील विरुद्ध शरद गटाचे नीलेश लंके

नगर लोकसभा मतदार संघात यंदा भाजपाचे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रसचे नीलेश लंके यांच्या लढत होणार आहे. गेली अनेक वर्षे भाजपाने हा मतदार संघ त्याब्यात घेतला आहे. धनगर आरक्षण हा मुद्दा येथे चर्चेत होता. नगरचे नामकरण अहिल्यानगर असे करुन भाजपा त्याचे श्रेय घेत आहे. नीलेश लंके यांनी अजितदादा यांची साथ सोडून शरद पवार यांना पाठींबा दिला होता. त्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत खासदारकीला ते उभे राहीले आहेत. त्यामुळे येथे सुजय विखे पाटील यांची स्वतंत्र प्रचार यंत्रणा आहे शिवाय महायुतीचीही मदत त्यांना मिळत आहे. तर लंके यांना महाविकास आघाडीची कुमक लागत आहे.

मावळ –

शिंदे गटाचे श्रीरंग बारणे विरुद्ध ठाकरे गटाचे संजोग वाघेरे

अखंड शिवसेनेला साथ देणारा हा पारंपारिक मतदार संघ आहे. येथे महायुतीचे शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे आणि ठाकरे गटाचे संजोग वाघेरे उभे राहीले आहेत. बारणे यांची संपूर्ण भिस्त आता महायुतीच्या मदतीवर आहे. भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्णण जगताप, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांचा दोनवेळा पराभव करुन बारणे यांच्या समोर तिसऱ्यांदा अवघड आव्हान आहे.

शिर्डी –

शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे- ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे – उत्कर्षा रुपवते

शिर्डी लोकसभा मतदार संघात शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे उमेदवार म्हणून उभे आहेत. तर ठाकरे गटाने माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेसच्या उत्कर्षा रुपवते यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे तिरंगी लढत होणार आहे.

रावेर –

भाजपाच्या रक्षा खडसे विरुद्ध शरद गटाचे श्रीराम पाटील

रावेर लोकसभा मतदार संघातून भाजपाने एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे उद्योजक श्रीराम पाटील रिंगणात आहेत. एकनाथ खडसे यांनी आपण भाजपात पुन्हा प्रवेश करणार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी अजून अधिकृत प्रवेश केलेला नाही. तरी एकनाथ खडसे यांनी आपल्या सूनबाईचा प्रचार सुरु केला आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.