मुंबई – राष्ट्रवादीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी डीपीडीसीचा फंड मतदार संघाला मजूर झाला. त्यामुळं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे धन्यवाद मानले आहेत. भाजपशी सलगी आणि राष्ट्रवादीशी दुरावा अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली. ही चर्चा अकारण आहे, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. राज्यपाल हटवण्याच्या मागणीला देखील त्यांनी समर्थन दिले आहे. बरेच दिवस काम जिल्हा नियोजन समितीची प्रलंबित होती. आता त्याला मंजुरी मिळाली आहे. यात राजकारण काही नाही. माझ्या मतदार संघातील कामांना मंजुरी मिळाली आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील जिल्हा नियोजन समितीचे प्रमुख असल्यामुळे मी त्यांचे धन्यवाद मानले आहेत. यात वेगळं वाटण्यासारखं काहीच नाही, असं अमोल कोल्हे म्हणाले.
आधीच्या कामांना स्थगिती याच सरकारनं दिली होती. आता मंजुरीपण याच सरकारनं दिली आहे. त्यामुळे आधीच्या सरकारच्या गतिमानतेचा आणि ह्या सरकारच्या गतिमानतेचा काहीच संबंध नाही. अमित शाह भेटीबाबत अमोल कोल्हे म्हणाले, हे उगाच चर्चा घडवली जात आहे. शिवप्रताप गरुड हा जो सिनेमा आला होता त्या संदर्भात मी गृहमंत्री अमित शाह यांना भेटलो होतो.
किल्ला शिवनेरीवर भगवा लागावा, शिवनेरीवर रोपवे व्हावा आणि छत्रपती शिवाजी महराजांचा जो जाजल्य इतिहास आहे त्या सिनेमाचं स्क्रिनिंग दिल्लीत व्हावं, यासाठीची ती भेट होती.
भाजपमध्ये जाण्याची चर्चा ही अकारण आहे. लोकसभा निवडणूक 2024 साली आहे. आभाळ कानी वारा पाहून शेत नांगरायला घेतात. शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून उगाच आउत खांद्यावर घेऊन फिरत नाही. अकारण चर्चा घडवण्यात काही अर्थ नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
शिरूर लोकसभा मतदार संघातील जनतेची काम मार्गी लावणे आणि आमचे नेते शरद पवार आणि लोकसभेत आमच्या गट नेत्या सुप्रिया ताई यांच्या नेतृत्वात आम्ही काम करत आहोत.
शिर्डीच्या कार्यक्रमात मी नव्हतो कारण माझ्या डेंटलचा प्रॉब्लेम होता. स्टार प्रचारकांची यादी बनवणं हे माझ्या हातात नाही. म्हणून त्याबद्दल मी काही उत्तर देऊ शकत नाही. मला दुसऱ्याच्या कानात काही बोलण्याची गरज नाही. माझ्या मतदार संघातील काम मार्गी लावणे ह्याला माझं प्राधान्य आहे, असंही अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं.