Amol Mitkari : मम भार्या समर्पयामि, अमोल मिटकरींचा हाच तो व्हिडीओ ज्यावर ब्राह्मण महासंघ लालेलाल, बघा पाटील, मुंडे हसून हसून लोटपोट

अरे येड्या, ते महाराज असं म्हणतायत मम म्हणजे माझी, भार्या म्हणजे बायको, समर्पयामि म्हणजे घेऊन जा. आरारा...मिटकरींनी असे म्हणताच जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या हास्याचा पुन्हा एकदा स्फोट झाला. शेवटी त्यांनी पाणावलेले डोळे पुसले.

Amol Mitkari : मम भार्या समर्पयामि, अमोल मिटकरींचा हाच तो व्हिडीओ ज्यावर ब्राह्मण महासंघ लालेलाल, बघा पाटील, मुंडे हसून हसून लोटपोट
मिटकरींच्या भाषणात जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांना हासू आवरेना.
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 4:18 PM

सांगलीः सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सभेत अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी कन्यादानाविषयी केलेले वक्तव्य चांगलेच चर्चेत आहे. त्यावरून ब्राह्मण महासंघ आक्रमक झाला आहे. त्यांनी अमोल मिटकरी यांच्याविरोधात राज्यभर असंतोष व्यक्त केला. पुण्यात ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी मिटकरी यांच्याविरोधात आंदोलन केले. तर महासंघाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर धडक देत त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला. यावेळी मिटकरींविरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. भाजप आध्यात्मिक आघाडीनेही मिटकरींविरोधात तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी, हा हिंदू धर्माची चेष्टा करणारा दुसरा तिसरा कोणी नसून राज्याच्या राजकारणातल्या शकुनी मामाचा सरदार असल्याचे म्हटले. तर दुसरीकडे मिटकरी यांचे भाषण आणि ही टीका सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे हसून हसून लोटपोट झाल्याचे व्हिडीओतून समोर येत आहे.

पाटलांना हासू आवरेना…

इस्लापूरमधल्या आपल्या भाषणात मिटकरी यांनी भाषण सुरू केले. ते म्हणाले, एका ठिकाणी मी गेलो होतो. त्या ठिकाणी कन्यादान होते, कन्यादान. मुलीचा बाप म्हणे साहेब बसा थोडं कन्यादान आहे. मी म्हटलं का हो, अन्नदान ऐकलं, रक्तदान ऐकलं, नेत्रदान ऐकलं. कन्या हा दान करण्याचा विषय असतो का हो. ते म्हणाले, असतो ना. आम्हाला शिकवलंय. असतो. बसा म्हटले. बसलो खुर्चीवर. बरं नवरदेव पीएच.डी. नवरी एम. ए. झालेली, अशा शब्दांत मिटकरींचे नकलेसह भाषण रंगात आलेले. तर भाषण ऐकणारे दोन्ही मंत्री जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांना हासू आवरता येत नव्हते. जयंत पाटील तर खुर्चीवर हासून-हासून बेजार झाले.

अन् पुन्हा हास्यकल्लोळ…

मिटकरी पुढे म्हणाले की, धुपमं दीपम नवैद्यम नमस्कारमं नमस्करोती. डोळ्याला पाणी लावा. हात पुढे करा. तुमचा हात माझ्या हातात द्या. तुमच्या पत्नीचाही हात माझ्या हातात द्या. (इकडे जयंत पाटील यांनी पुन्हा जोरजोरात हासायला सुरुवात केली.) म्हणा मम् भार्या समर्पयामि. आचमन करा. धुपमं दीपम नवैद्यम नमस्कारमं नमस्करोती. मम भार्या समर्पयामि. मी त्या नवरदेवाच्या कानात सांगितलं. अरे येड्या, ते महाराज असं म्हणतायत मम म्हणजे माझी, भार्या म्हणजे बायको, समर्पयामि म्हणजे घेऊन जा. आरारा…मिटकरींनी असे म्हणताच जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या हास्याचा पुन्हा एकदा स्फोट झाला. शेवटी त्यांनी पाणावलेले डोळे पुसले.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.