महापुरुषांनी भीक नाही मागितली म्हणत अमोल मिटकरी कडाडले…चंद्रकांत पाटलांना मिटकरी यांनी चांगलंच सुनावलं
चंद्रकांत पाटील यांनी आत्ताचे शाळा सुरू करतांना सरकारच्या अनुदानावर अवलंबून राहतात, मात्र पूर्वी महापुरुषांनी शाळा सुरू केल्या त्यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या असे विधान केले आहे.
पंढरपूर : पैठण येथे एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. सरकारवर अवलंबून न राहता भाऊराव पाटील, महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळा चालू करण्यासाठी भिक मागितली होती असं चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे. यावरून चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी चांगलेच सुनावले आहे. महापुरुषांनी लोकवर्गणीतून आणि स्वतःच्या पैशातून शाळा सुरू केल्या आहेत. त्याला भीक नाही म्हणत. असं म्हणून चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांचा अपमान केल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे. चंद्रकांत पाटालांनी मंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांकडे भिक मागितली, तशी महामानवांनी शाळा सुरू करण्यासाठी भिक मागितली नाही असा टोला मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.
लोकांकडून वर्गणी गोळा करून शाळा सुरू केल्या, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टिका केली आहे
भाजप नेत्यांच्या मस्तकातील घाण काढण्यासाठी गाडगे बाबांचा झाडू हाती घ्यावा लागेल. सतत महामानवांचा अपमान केला जात आहे. असेही अमोल मिटकरी यांनी म्हंटले आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, सुधांशु त्रिवेदी, मंगलप्रभात लोढा, प्रसाद लाड आणि त्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनीही महापुरुषांवर बोलतांना केलेले विधान वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी आत्ताचे शाळा सुरू करतांना सरकारच्या अनुदानावर अवलंबून राहतात, मात्र पूर्वी महापुरुषांनी शाळा सुरू केल्या त्यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या असे विधान केले आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या या विधानावरून राष्ट्रावादीचे अमोल मिटकरी यांनी सडकून टीका केली असून येत्या काळात यावरून आणखी वातावरण तापण्याची शक्यता आहे.