गूगलवर मंगळसूत्र चोर सर्च करा, काय दिसतं? अमोल मिटकरींकडून भाजप नेत्याची तुफान खिल्ली

चोर या शब्दावरून सध्या चांगलंच राजकारण पेटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही हाच धागा पकडत भाजप आमदाराची खिल्ली उडवली आहे.

गूगलवर मंगळसूत्र चोर सर्च करा, काय दिसतं? अमोल मिटकरींकडून भाजप नेत्याची तुफान खिल्ली
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Mar 28, 2023 | 8:53 AM

मुंबई : चोर शब्दावरून राजकारण पेटलं असताना आता अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनीही नेमका हाच शब्द पकडत भाजप नेत्याला कोंडीत पकडलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्व शरद पवार (Sharad Pawar) यांचा अपमान करणाऱ्या भाजप (BJP) नेत्यावर एकामागून एक झोंबणाऱ्या टीका करण्याचा सपाटाच अमोल मिटकरी यांनी लावला आहे. त्यात हे आमदार गोपीचंद पडळकर असल्याने दोन्ही बाजूने टीकांचा भडीमार सुरु आहे. आता तर गूगल सर्चचा आधार घेत अमोल मिटकरी यांनी गोपीचंद पाडळकरांची तुफ्फान खिल्ली उडवली आहे. गूगलवर मंगळसूत्र चोर सर्च करा, त्यात किती रंजक माहिती येते पहा, असं ट्विट मिटकरी यांनी केलंय. यावर गोपीचंद पडळकर काय उत्तर देतायत याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.

अमोल मिटकरी यांचं ट्विट चर्चेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी गोपीचंद पडळकर यांचं नाव न घेता ट्विट केलंय. मात्र गूगलवर मंगळसूत्र चोर असं सर्च करायला सांगून त्यातील रंजक माहिती वाचा, असं म्हटलंय. तसेच गूगलला आता चोर मार्केटदेखील माहिती झालंय, असा टोला लगावलाय. यासोबतच, अध्यक्ष महोदय आता गूगलवर काय कारवाई करणार, असा सवाल भाजपला विचारण्यात आलाय.

खरच चोरलं होतं मंगळसूत्र?

राजकीय नेत्यांना आरोप प्रत्यारोप नवे नसतात. अनेक नेत्यांवर वेगवेगळे गुन्हेही दाखल असतात. कधी कधी ते राजकीय सूडापोटी केले जातात. अशाच प्रकारे काही वर्षांपूर्वी राजकीय वैमनस्यातून झालेल्या वादानंतर गोपीचंद पडळकर आणि विरोधी कार्यकर्त्यांचे एका लग्नसमारंभात वाद झाले होते. यावेळी धक्काबुक्की झाली होती. या प्रकारात काही महिलांचे मंगळसूत्र चोरल्याचे आरोपही करण्यात आले होते.

गोप्याच्या बुडाखाली आग…

शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात अमोल मिटकरी यांनी कालदेखील टीका केली होती. हा गोप्या म्हणजे भट्टीच्या तव्यावर बसलेल्या बाबासारखा आहे. पवारांचं नुसतं नाव जरी ऐकलं की गोप्याच्या बुडाला आग लागली म्हणून समजा… याला जास्त दिवस संन्यासी ठेवणे भाजपाला परवडणार नाही, अशी टीका मिटकरी यांनी केली होती.

पडळकरांचं वक्तव्य काय?

त्यापूर्वी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी पवार घराण्यावर गंभीर टीका केली होत. महाराष्ट्राचे तीन भाग करा. एक लवासा, एक बारामती आणि एक मगरपट्टा. मगरपट्ट्याचा मुख्यमंत्री जयंत पाटलांना करा. लवासाचे मुख्यमंत्री सुप्रिया सुळे तर बारामतीचे मुख्यमंत्री अजित पवार यांना करा. मग या तिन्हीचा मिळून एकत्र देश करा. त्या देशाचा पंतप्रधान शरद पवार यांना करा, अशी खोचक टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती. बारामतीचं तिकिट कुणाला मिळणार माहिती नाही, पण ज्याला मिळणार तो भाग्यवान ठरणार, तो पवारांना पाडून संसदेत जाणार, असं वक्तव्य पडळकर यांनी केलं होतं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.