अमरावतीचे जुने नाव उदंब्रावती होतं. पुढे त्याचा अपभ्रंश उम्ब्रवती आणि नंतर अमरावती असा झाला. आंबादेवीच्या प्राचीन मंदिरामुळे या जिल्ह्याला अमरावती नाव पडलं आहे. जैनांच्या इतिहासातही अमरावती जिल्ह्याच्या खाणाखुणा सापडतात. 12,235 वर्ग कि.मी. क्षेत्रफळावर हा जिल्हा वसलेला आहे. जिल्ह्याची लोकसंख्या 28,88,445 एवढी आहे. जिल्ह्यातील साक्षरतेचं प्रमाण 93.03% आहे. कापूस, संत्री आणि केळी ही येथील प्रमुख पिके आहेत. त्याशिवाय खाण्याच्या पानाचीही अमरावतीत मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. चिखलदरा पर्यनट स्थळ, मेळघाट व्याघ्रप्रकल्प आणि भारतातील सर्वात मोठे क्रिडा संस्थान ’हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ’ ही या जिल्ह्याची खास ओळख आहे. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, शिक्षण महर्षी पंजाबराव देशमुख, पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, डॉ. आबासाहेब खेडकर, बिहारचे माजी राज्यपाल रा. सू. गवई, गझल सम्राट सुरेश भट, क्रिकेटर हेमंत कानिटकर आणि अभिनेते मोहन देशमुख हे अमरावतीचेच. अमरावती, अचलपूर, वरूड, चांदूर बाजार, धारणी, मोर्शी, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, चिखलदरा, भातकुली, तिवसा आणि चांदूर रेल्वे आदी 14 तालुके या जिल्ह्यात येतात. अमरावती, बडनेरा, दर्यापूर, अचलपूर, तिवसा, मेळघाट, मोर्शी आणि धामणगाव आदी आठ विधानसभा मतदारसंघ अमरावतीत आहेत.
अमरावती जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी टीव्ही9 मराठीच्या साईटला आवर्जून भेट द्या.
पुढे वाचा