राज्यमंत्री बच्चू कडू यांनी वृद्धांना घातलं अभ्यंगस्नान, पुरणपोळीचं जेवण देत दिवाळी केली खास!

बच्चू कडू यांनी सकाळी मधुबन वृद्धाश्रमातील वृद्धांना सुगंधी उटणे लावून अभ्यंगस्नान घातलं. सर्वांना नव्या कपड्यांचं वाटप केलं. महिलांना साडीचोळी, शॉलचा त्यात समावेश होता. तसंच सर्वांना खास पुरणपोळीचं जेवण घालत, बच्चू कडू यांनी स्वत: जेवण वाढलं.

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी वृद्धांना घातलं अभ्यंगस्नान, पुरणपोळीचं जेवण देत दिवाळी केली खास!
Follow us
| Updated on: Nov 13, 2020 | 2:30 PM

अमरावती: राज्यमंत्री आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू आपल्या वेगळ्या अंदाजासाठी आणि आपल्या सामाजिक कार्यासाठी नेहमीच ओळखले जातात. बच्चू कडू यांच्या वेगळेपणाचा प्रत्यय आजही आला. आज धनत्रयोदशी आहे. सर्वत्र दिवाळीचा माहोल पाहायला मिळत आहे. मात्र, ज्यांना कुणी नाही किंवा जे लोक वृद्धाश्रमात आपलं उर्वरित जिवन व्यतीथ करत आहेत. अशा वृद्धांसाठी बच्चू कडू यांनी खास दिवाळी साजरी केली. अमरावतीमधील मधुबन वृद्धाश्रमात बच्चू कडू यांनी वृद्धांसोबत दिवाळीचा आनंद लुटला. (Bacchu Kadu celebrate his Diwali in old age home)

बच्चू कडू यांनी सकाळी मधुबन वृद्धाश्रमातील वृद्धांना सुगंधी उटणे लावून अभ्यंगस्नान घातलं. सर्वांना नव्या कपड्यांचं वाटप केलं. महिलांना साडीचोळी, शॉलचा त्यात समावेश होता. तसंच सर्वांना खास पुरणपोळीचं जेवण घालत, बच्चू कडू यांनी स्वत: जेवण वाढलं. यावेळी वृद्धांश्रमातील सर्वांचे डोळे पाणावले होते. जिथे पोटच्या पोरांनी या वृद्धांना वृद्धाश्रमात ठेवलं. तिथे बच्चू कडू यांच्यासारख्या एका मंत्र्यांने दाखवलेला जिव्हाळा या वृद्धांच्या मनाय मायेची उब निर्माण करणारा ठरला.

बच्चू कडू यांची प्रहार संघटना राज्यभरातील दिव्यांग लोकांसाठी काम करत आली आहे. दिव्यांगांना त्यांचा हक्क मिळवून देण्यात बच्चू कडू कायम अग्रेसर असतात. त्याचबरोबर अनेक निराधारांनाही बच्चू कडू यांनी मोठा आधार दिला आहे.

…तर मी भाजपमध्ये यायला तयार- बच्चू कडू

केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांमध्ये दोन महत्त्वाचे बदल केले तर मी भाजपमध्ये जाण्यास तयार आहे, असा खळबळजनक दावा जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केला आहे. अहमदनगर येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. बच्चू कडू यावेळी म्हणाले की, शेतकऱ्यांना 50% नफा धरून हमी भाव द्यायला पाहिजे आणि शेतमाल खरेदीची हमी सरकारने घेतली पाहिजे. केंद्र सरकारने कृषी कायद्यांमध्ये या दोन सुधारणा केल्यास मी भाजपमध्ये जाऊन त्यांची सेवा करेन

संबंधित बातम्या:

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच आर्थिक मदत मिळेल, बच्चू कडूंचं आश्वासन

अनाथ विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेचा प्रस्ताव तयार करा : राज्यमंत्री बच्चू कडू

Bacchu Kadu celebrate his Diwali in old age home

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.