Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमरावतीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, राणा दाम्पत्याची विना मास्क बुलेटवारी!

कोरोनापासून बचावासाठी मास्क लावणे बंधनकारक करण्यात आलंय. असं असलं तरी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी सरकारने घालून दिलेले नियम पायदळी तुडवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

अमरावतीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, राणा दाम्पत्याची विना मास्क बुलेटवारी!
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 4:01 PM

अमरावती : राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत आहे. अमरावती जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संथ्या झपाट्याने वाढत आहे. अशावेळी कोरोनापासून बचावासाठी मास्क लावणे बंधनकारक करण्यात आलंय. असं असलं तरी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी सरकारने घालून दिलेले नियम पायदळी तुडवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राणा दाम्पत्याने विना मास्क आणि विना हेल्मेट अमरावती शहरात बुलेटवरुन फेरफटका मारल्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.(MP Navneet Rana and MLA Ravi Rana travel without a mask)

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे विविध कारणांमध्ये अनेकदा चर्चेत असतात. त्यात रवी राणा यांची आंदोलनं तर नवनीत राणा यांचं लोकसभेतील भाषण आणि ठाकरे सरकारवरील टीका नेहमीच चर्चेत असते. आता हे राणा दाम्पत्य एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलंय. राज्यात कोरोना विषाणू पुन्हा डोकं वर काढतोय. अमरावती जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशावेळी कोरोनाला रोखण्यासाठी मास्क वापरणं आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचं आहे. पण नवनीत राणा आणि रवी राणा हे मास्क न घालताच अमरावती शहरातून बुलेटवारी करतानाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

सामान्यांना नियमावली, लोकप्रतिनिधींना नाही का?

अमरावती जिल्ह्यात सध्या कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कोरोनाचे नियम कडक केले आहेत. वाहनांवर प्रवास करत असताना प्रत्येकाने मास्क लावणे बंधनकारक करण्यात आलं आहे. जे लोक मास्क लावत नाहीत त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. आतापर्यंत 200 पेक्षा जास्त लोकांवर कारवाई करण्यात आली आहे.असं असताना शिवजयंती निमित्त कार्यक्रमाला जाताना नवनीत राणा आणि रवी राणा हे दोघेही बुलेटवर गेले. पण त्यावेळी दोघांनीही मास्क आणि हेल्मेट घातलेलं नव्हतं. अशावेळी सर्वसामान्य नागरिकांना बंधनकारक असलेली नियमावली लोकप्रतिनिधींना नाही का? असा प्रश्न विचारला जात आहे.

अमरावती जिल्ह्यातही लॉकडाऊन जाहीर

यवतमाळपाठोपाठ अमरावतीतही लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने अमरावती जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर झालाय. दर रविवारी जिल्हा बंद ठेवण्यात येणार असून, केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, अशी माहिती अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिलीय. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात रविवारी लॉकडाऊनची घोषणा झालीय.

अमरावती जिल्ह्यात दर आठवड्यात शनिवार रात्री 8 ते सोमवारी सकाळी 8 पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. उद्या 19 फेब्रुवारीपासून शहर आणि जिल्ह्यातील सर्व आस्थापना, हॉटेल्स दररोज रात्री 8 वाजता बंद होणार आहेत. जलतरण तलाव, इनडोअर गेम पूर्णपणे बंद राहणार आहेत. धार्मिक समारंभाला केवळ 5 व्यक्तींचीच परवानगी असणार आहे. तसेच त्रिसूत्री नियमांचे पालन न केल्यास आणखी कठोर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिलीय.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रातल्या ह्या 11 शहरांवर लॉकडाऊनचं संकट? कोरोना वाढतोय, यंत्रणा अलर्टवर!

नवनीत राणांच्या जीवीतास धोका? शिवसेनेच्या कथित लेटरहेडवर अ‌ॅसिड फेकण्याच्या धमकीमुळे खळबळ

MP Navneet Rana and MLA Ravi Rana travel without a mask

जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.
छेडछाडीला कंटाळून तरुणीने लग्नाच्या आधल्या रात्रीच असं काही केलं की..
छेडछाडीला कंटाळून तरुणीने लग्नाच्या आधल्या रात्रीच असं काही केलं की...
अबब! घराच्या छतावर आकाशातून पडला 50 किलोच धातू
अबब! घराच्या छतावर आकाशातून पडला 50 किलोच धातू.
उद्धव ठाकरेंकडून कोणत्याही अटी नाही; ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांचं
उद्धव ठाकरेंकडून कोणत्याही अटी नाही; ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांचं.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी.
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट.