VIDEO | मेळघाटात खासदार नवनीत राणा यांचा कोरकू नृत्यावर ठेका
मेळघाटातील आदिवासी समुदायातील नागरिकांसोबत खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी होलिकोत्सव साजरा केला. (Navneet Rana Korku Dance )
अमरावती : राज्यभरात कोरोनाचा उद्रेक सुरु असताना होळी साध्या पद्धतीने, केवळ घरी साजरी करा, असं आवाहन सरकारने केलं आहे. विशेषतः अनेक राजकीय नेत्यांनी धुळवडीच्या कार्यक्रमांना जाणं टाळलं. मात्र अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी मेळघाटातील आदिवासींसोबत होळीचा मनसोक्त आनंद लुटला. नवनीत राणा यांनी मेळघाटातील आदिवासी महिलांसोबत कोरकू हे आदिवासी नृत्य करत आनंद व्यक्त केला. (Amravati MP Navneet Rana Korku Dance with Melghat Tribal)
मेळघाटातील आदिवासी समुदायातील नागरिकांसोबत खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी होलिकोत्सव साजरा केला. यावेळी नवनीत राणा यांनी आदिवासींचं प्रसिद्ध कोरकू नृत्य केलं. खासदार नवनीत राणा आदिवासी महिलांसोबत नृत्य करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.
पाहा व्हिडीओ :
याआधी, खासदार नवनीत कौर राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी होळीचे दहन केले. वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण (Deepali Chavan Suicide) यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींच्या प्रतिमेचे दहन राणा दाम्पत्याने केले. खासदार, आमदार, गावकरी आणि वनरक्षक यांच्या उपस्थितीत दीपाली चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण केली.
दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केलेल्या हरीसाल येथील शासकीय निवासस्थानाला नवनीत राणा आणि रवी राणा यांनी भेट दिली. घटनास्थळाची पाहणी करत ही दुर्दैवी घटना कशी घडली याची माहिती शेकडो आदिवासी बांधव आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत घेतली.
या दुर्दैवी घटनेला जबाबदार असणारे डीएफओ शिवकुमार आणि सीसीएफ श्रीनिवास रेड्डी यांच्या पुतळ्याचे होळीमध्ये दहन करुन राणा दाम्पत्याने घटनेचा निषेध व्यक्त केला. या प्रकरणात दोषी असणारे डीएफओ शिवकुमार आणि श्रीनिवास रेड्डी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी उपस्थित मेळघाटवासियांनी राणा दाम्पत्याकडे केली. (Amravati MP Navneet Rana Korku Dance with Melghat Tribal)
कर्तव्यदक्ष महिलेच्या आत्महत्येची घटना दुर्दैवी
एका कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्याला वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करावी लागणे, अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला काळिमा फासणारे असल्याचे नवनीत रवी राणा म्हणाल्या. यासाठी जबाबदार असणाऱ्या शिवकुमार आणि श्रीनिवास रेड्डी यांच्यावर कलम 302 आणि 354 अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा, यासाठी आपण राज्यपाल, केंद्रीय वनमंत्री, मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे वचनही त्यांनी गावकऱ्यांना दिले.
फाशीच झाली पाहिजे, नवनीत राणा आक्रमक
या गंभीर घटनेची सखोल चौकशी व्हावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी खासदार म्हणून आपण संसदेत आणि आमदार रवी राणा विधानसभेत खंबीरपणे आवाज उचलणार असल्याचं, नवनीत राणांनी सांगितलं. दोषींना फक्त कठोर शिक्षा नव्हे, तर फाशीच झाली पाहिजे, अशी मागणी करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
संबंधित बातम्या :
दीपाली चव्हाणला आत्महत्येस प्रवृत्त, आरोपींच्या प्रतिमांचं नवनीत राणांच्या हस्ते होलिकादहन
(Amravati MP Navneet Rana Korku Dance with Melghat Tribal)