Indian Travelers : लंडन विमानतळावर 300 भारतीय प्रवासी अडकले, इंडियन एअरलाईन्सने सूचना न देता रद्द केले विमान

भारतीय प्रवासी या घटनेमुळं चांगलेच संतप्त झालेत. त्यांनी विमानतळ प्रशासनाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना समाधानकारक उत्तर मिळू शकलं नाही. लंडन विमानतळावरून मुंबईला येणारी फ्लाईट वातावरणातील बदलामुळं इंडियन एअरलाईन्सनं रद्द केली.

Indian Travelers : लंडन विमानतळावर 300 भारतीय प्रवासी अडकले, इंडियन एअरलाईन्सने सूचना न देता रद्द केले विमान
लंडन विमानतळावर 300 भारतीय प्रवासी अडकलेImage Credit source: File photo
Follow us
| Updated on: Jul 08, 2022 | 4:51 PM

अमरावती : लंडन विमानतळावर जवळपास 300 भारतीय अडकले आहेत. भारतामध्ये येणारे इंडियन एअरलाईनचे विमान लंडन सरकारने अचानक काहीही सूचना दे न देता रद्द केले. त्यामुळं भारतीयांची (Indian) लंडन विमानतळावर गैरसोय होत आहे. शिवाय त्यांना सुरुवातीला या संदर्भात कुठलेही प्रकारची माहिती फोनद्वारे (Phone) किंवा मेलद्वारे (Mail) या इतर माध्यमातून देण्यात आली नाही. आज सगळे ही भारतीय भारताकडे निघण्यासाठी विमानतळावर आले. तेव्हा अचानक flight रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आलं. याची कुठल्याही प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी नाही. हे सगळेच भारतीय आपल्या वैयक्तिक कामानिमित्त लंडनला गेले होते. आता परत येत असताना यांना समस्या निर्माण होत आहे.

अमरावतीचे मिलिंद चिमोटे अडकले

यापैकी अनेकांनी त्यांचे आर्थिक परिस्थिती गंभीर आहे. काहींनी हॉटेलमधून चेक आऊट केला आहे. त्यामुळे अनेकांची गैरसोय होत आहे. अमरावतीची काँग्रेसचे प्रवक्ता मिलिंद चिमोटे हे सुद्धा सध्या विमानतळावर अडकले आहेत. त्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात गरज पूर्ण होत नाही. विमानतळ संचालक या संदर्भात बोलण्यास तयार नाहीत. त्याबद्दल सगळ्या भारतीयांनी त्यांना घेरावसुद्धा घातला. उद्या ही फ्लाईट केव्हा जाईल. तेसुद्धा सांगितलं जात नाही. प्रवाशांना कोणत्याही सुविधा दिल्या जात नाही. शेकडो लोकं रस्त्यावर आहेत. राहण्याची व्यवस्था करून द्यावी. तीनशे लोकं अडकले आहेत. भारताच्या नागरी उड्डायण विभागनं मदत करावी, अशी विनंतीही प्रवासी करताहेत.

राहायचं कुठं, प्रवास कुठं करायचा?

भारतीय प्रवासी या घटनेमुळं चांगलेच संतप्त झालेत. त्यांनी विमानतळ प्रशासनाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना समाधानकारक उत्तर मिळू शकलं नाही. लंडन विमानतळावरून मुंबईला येणारी फ्लाईट वातावरणातील बदलामुळं इंडियन एअरलाईन्सनं रद्द केली. दोन तास प्रवास करून लंडन येथील विमानतळावर पोहचले. पण, याठिकाणी राहण्याची कुठलीही व्यवस्था नाही. तसेच वाहतूक व्यवस्थासुद्धा नसल्याचा आरोप प्रवाशांनी केलाय. ही बाब अतिशय खेदजनक आहे. प्रवासी उद्विग्न झाले आहे. लहान मुलं रडत आहेत. इथून परत जाऊन दुसरीकंड राहण्याचा लंडनमध्ये मोठा खर्च आहे. काहींकडं असा खर्च करण्यासाठी बजेट नाही. अशावेळी त्यांनी काय करायचं, असा सवाल प्रवासी करताहेत. एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी या प्रवाशांच्या समस्येवर उपाय शोधावा. आम्हाला राहण्याची व्यवस्था करून द्यावी. किंवा वाहतूक सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.