Anil Bonde | यशोमती ठाकूर यांच्यावरील टीका भोवली, अमरावतीत अनिल बोंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

पालकमंत्री यशोमती ठाकूर या समाजात तेढ निर्माण करतात, असा आरोप भाजप नेते अनिल बोंडे यांनी केला होता. याविरोधात काँग्रेसच्या हरिभाई मोहोड यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली. बोंडे हे ठाकूर यांची बदनामी करतात. त्यामुळं त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार केली होती. यावरून पोलिसांनी बोंडे यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

Anil Bonde | यशोमती ठाकूर यांच्यावरील टीका भोवली, अमरावतीत अनिल बोंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल
अनिल बोंडे यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 1:56 PM

अमरावती : काँग्रेसचे हरिभाऊ मोहोड यांनी अनिल बोंडे (Anil Bonde) यांच्या विरोधात मंगळवारी दुपारी तक्रार नोंदविली होती. पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांची व शासनाची बदनामी केली. त्याचबरोबर समाजात तेढ निर्माण करण्याचा हा प्रकार अतिशय गंभीर असल्याने डॉ. बोंडे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करावा. त्यांना अटक करावी अशी तक्रार मोहोड यांनी केली होती. याप्रकरणी भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांच्याविरुद्ध अमरावतीच्या गाडगेनगर पोलिसात (Amravati Police) गुन्हा दाखल करण्यात आलाय. मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर अचलपूर दंगलीच्या मास्टरमाइंड असल्याचा आरोप बोंडेंनी केला होता. काँग्रेसचे प्रदेश सचिव हरिभाऊ मोहोड यांच्या तक्रारी वरून अनिल बोंडे यांच्यावर 502 (2)अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

बोंडेंच्या फोटोला दुग्धाभिषेक

भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांनी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर दंगली मागे हात असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अमरावतीत युवक काँग्रेसनं आंदोलन केलं. मानसिक रुग्णालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. अनिल बोंडेंच्या फोटोला युवक काँग्रेसने दुग्धभिषेक घातला. डॉ. अनिल बोंडे यांनी मंत्री यशोमती ठाकूर यांना जबाबदार धरत अचलपूर घटनेच्या त्या मास्टरमाइंड असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्याला प्रतिउत्तर म्हणून तिवसा तालुक्यातील युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मोझरी येथील प्राचीन शिवमंदिरात जाऊन आरती केली. तसेच अनिल बोंडे यांच्या प्रतिमेला दुग्धभिषेक करत अनिल बोंडे यांना सद्सद् विवेक बुद्धी मिळावी. त्यांचे मानसिक संतुलन सुधारावे, असे साकडे युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घातले.

यशोमती ठाकूर यांचे अनिल बोंडेंवर आरोप

अमरावती पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अनिल बोंडे वैफलग्रस्त अवस्थेत असल्याचं म्हटलं. अनिल बोंडेचा अमरावतीत तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. पोलीस तपास करत आहेत. बोंडे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असंही ठाकूर म्हणाल्या होत्या. अमरावतीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. अमरावतीचं वातावरण खराब करण्याचं काम केल गेलंय. सल्लोख्याचं वातावरण बिघडवण्याचा राजकीय प्रयत्न केल्याचा आरोप ठाकूर यांनी केला होता. त्यानंतर आज अनिल बोंडे यांच्या विरोधात गाडगेनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Car Birthday | भंडाऱ्यात मालकाने साजरा केला चक्क कारचा वाढदिवस, 34 वर्षे अविरत सेवा

11th Class Admissions| राज्यात अकरावी प्रवेशासाठी आता वेटिंग लीस्ट, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य फेरी बंद

Nagpur ST | आधी एसटी बससमोर नतमस्तक, नंतर लालपरीचं स्टेअरिंग हाती; नागपूर विभागात 327 कर्मचारी रुजू

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.