Eknath Shinde : ‘अजूनही वेळ गेलेली नाही, आमदारांची चूक सुधारावी आणि परत यावं’, शिंदेंच्या गोटातून सुटलेले आमदार नितीन देशमुखांचं आवाहन
मुंबईः विधान परिषदेच्या निकालानंतर (Vidhan Parishad Result) एकनाथ शिंदे यांच्या घडलेले आणि सुरू असलेले नाराजी नाट्य थांबायचे काही दिसत नाही. गुजरातमधील सूरतमधून थेट गुवाहाटीला घेऊन गेलेल्या 35 आमदारांपैकी नितीन देशमुख (Shivsena MLA Nitin Deshmukh) हे आमदार पुन्हा परतल्यानंतर अमरावती शहरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले त्यावेळी त्यांनी त्यांच्याबाबतीत आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बरोबर […]
मुंबईः विधान परिषदेच्या निकालानंतर (Vidhan Parishad Result) एकनाथ शिंदे यांच्या घडलेले आणि सुरू असलेले नाराजी नाट्य थांबायचे काही दिसत नाही. गुजरातमधील सूरतमधून थेट गुवाहाटीला घेऊन गेलेल्या 35 आमदारांपैकी नितीन देशमुख (Shivsena MLA Nitin Deshmukh) हे आमदार पुन्हा परतल्यानंतर अमरावती शहरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले त्यावेळी त्यांनी त्यांच्याबाबतीत आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बरोबर असलेल्या आमदारांविषयी त्यांनी परत येण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी त्यांनी झालेल्या मारहाणीबद्दलही सांगत आपल्याला एकनाथ शिंदे यांच्याकडून मारहाण झाली नसून गुजरात पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचे त्यांनी सांगितले.
नितीन देशमुखांना हृदविकाराचा झटका
अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेल्यापासून चर्चेत होते. ते सूरतमध्ये गेल्यानंतर काही तासातच त्यांच्या पत्नीने त्यांना भेटायला जाणार असल्याचे सांगितले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचेही सांगण्यात आल्यानंतर सूरतमधूली सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यापासून ते चर्चेत होते.
देशमुखांचे अमरावतीत जंगी स्वागत
त्यानंतर ते गुवाहाटीला गेल्यानंतरही ते त्यांच्या आजाररपणामुळे चर्चेत आले होते. गुवाहाटाली काही आमदार असतानाही त्यातून निसटून आलेले नितीन देशमुख अमरावती आल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आमदार एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेले असले तरी हे मतदार हे उद्धाव ठाकरे यांच्यासोबत आहेत असंही त्यांनी सांगितले.
गुजरात पोलिसांनी केली मारहाण
आमदार नितीन देशमुख जेव्हापासून सूरतला गेले होते तेव्हापासून ते त्यांच्या आजारपणामुळे आणि त्यांना मारहाण झाल्यामुळे चर्चेत आले होते. त्याविषयी त्यांना ज्यावेळी विचारण्यात आले त्यावेळी आपल्याला एकनाथ शिंदे यांच्याकडून मारहाण झाली नसून आपल्यला गुजरात पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचे सांगितले.
आमदारकीचा विचार करा
यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या सगळ्या आमदारांनी त्यांनी त्यांच्या आमदारकीचा विचार करून परत यावे असंही त्यांनी सांगितले. त्याबरोबरच आपल्यासोबत असणाऱ्या शिवसैनिकांचाही विचार करावा असंही देशमुख यांनी यावेळी सांगितले.