आजोबांसोबत गॅसचा फुगा घ्यायला गेली असता सिलिंडरचा स्फोट! 2 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

Amravati News : यात्रेत उडणारा फुगा बघून ती आपल्या आजोबांसबोत फुगेविक्रेत्याच्या जवळ पोहोचली. त्याच दरम्यान, फुगे विक्रेत्या जवळील गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला आणि ती गंभीररीत्या जखमी झाली.

आजोबांसोबत गॅसचा फुगा घ्यायला गेली असता सिलिंडरचा स्फोट! 2 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू
सिलिंडरच्या स्फोटात मृत्यूImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 28, 2022 | 10:04 AM

अमरावती : अमरावती (Amravati News) जिल्ह्यात बैलपोळ्याच्या दिवशी काळीज हेलावून टाकणारी एक घटना घडलीय. आजोबांसोबत फुगे घेण्यासाठी गेलेल्या 2 वर्षांच्या चिमुकलीवर काळानं घाला घातलाय. हवेत उडणारा फुगा पाहून ही मुलगी आपल्या आजोबांना घेऊन फुगा घेण्यासाठी गेली. पण गॅसचा फुगा (Gas Balloon) घेण्यासाठी गेली असता, अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात दोन वर्षांच्या चिमुकलीचा जीव गेला. ही हृदयद्रावक घटना अमरावती जिल्ह्यामध्ये घडली. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर (Achalpur) तालुक्यातील शिंदी बुद्रूकमध्ये घडलेल्या या घटनेनं हळहळ व्यक्त केली जातेय. परी सागर रोही असं दोन वर्षांच्या या चिमुकलीचं नाव आहे. गॅस सिलिंडरच्या स्फोटात झालेल्या मृत्यूने परीच्या आई वडिलांसह इतर नातलगांनाही मोठा धक्का बसलाय. या घटनेमुळे संपूर्ण गाव शोकसागरात बुडालंय. गावातील पोळ्याच्या जत्रेदरम्यानच ही धक्कादायक घटना घडली. त्यामुळे पोळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जत्रेच्या आनंदाला गालबोट लागलं.

स्फोटात आधी पाय गमावला

परी सागर रोही ही दोन वर्षांची मुलगी आपल्या आजोबांसोबत तान्हा पोळ्याच्या यात्रेला गेली होती. या यात्रेत उडणारा फुगा बघून ती आपल्या आजोबांना सोबत घेऊन फुगेविक्रेत्याच्या जवळ पोहोचली. त्याच दरम्यान, फुगे विक्रेत्या जवळील गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला आणि परी गंभीररीत्या जखमी झाली. तिची जखम इतकी मोठी होती की दोन वर्षांच्या चिमुकलीचा पाय शरीरापासून वेगळा झाला होता.

हे सुद्धा वाचा

मृत्यूशी झुंज अपयशी

गंभीर जखमी झालेल्या परीला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान चिमकुल्या परीचा मृत्यू झाला. अचलपूरमध्ये रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला. दोन वर्षांच्या नातीसोबत गेलेल्या आजोबांनाही परीच्या मृत्यूने मोठा धक्काच बसला. रोही कुटुंबातील इतरही सदस्यांना ही बाब कळल्यानंतर त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली. हा स्फोट इतका भीषण होता की, गावातील काही घरांना तडेही गेले होते. शिंदी बुद्रुक येथे घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जातेय.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.