‘हा’ पक्ष संपवण्याचा भाजपचा प्लॅन!; बच्चू कडू यांचं सर्वात मोठं विधान
Bachhu Kadu on BJP Loksabha Election 2024 : आमच्याशी अजूनही कोणतीही चर्चा झाली नाही!; महायुतीतील जागावाटपावर बच्चू कडू यांचं स्पष्ट विधान... जागावाटपावर बोलताना आमदार बच्चू कडू यांचं मोठं विधान. भाजपला 'तो' पक्ष संपवायचा आहे, असं मोठं विधान, वाचा सविस्तर...
स्वप्नील उमप, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, अमरावती | 03 मार्च 2024 : लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात राज्यातील काही बड्या नेत्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होऊ शकतो अशी चर्चा आहे. यात खासदार नवनीत राणा यांच्या नावाचीही चर्चा आहे. यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी भाजपच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. महायुतीतील जागावाटपावर बच्चू कडू यांनी भाष्य केलंय. तसंच वंचित आघाडी ही महाविकास आघाडीत सामील होऊ शकते. तशी चर्चा सध्या सुरू आहे. यावर बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली आहे.
“भाजप तो पक्ष संपवणार”
हाती झेंडा घेतला म्हणजेच भाजपच होतो असं नाही. नवनीत राणा यांचं अंतर्मन भाजपाचंच आहे. आधी नवनीत राणा या हिरवा, भगवा आणि निळा झेंडा घेऊन लढत होत्या. आता त्या भगवा झेंडा घेऊन फिरतात. हिंदू शेरणी झाल्या आहेत. भाजप हे आता नवनीत आणि रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष संपवणार आहे. भाजपमध्ये जाऊन त्यांचा स्वाभिमान संपवला नाही पाहिजे, असं बच्चू कडू म्हणाले.
वंचित आणि मविआच्या आघाडीबाबत बच्चू कडू म्हणाले…
प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी स्वतंत्र लढत असेल म्हणून ते महाविकास आघाडीच्या बैठकीला जात नसतील, असं बच्चू कडू म्हणाले. प्रहारचा मुख्यमंत्री झाल्यावर व्यवस्था बदलणार आहे. आमच्या मतदारसंघात सव्वा लाख लोकांना पगार देतोय, असा विश्वासही बच्चू कडू यांनी व्यक्त केला.
आमच्याशी अजून बोलणीच नाही!- बच्चू कडू
लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभेच्या जागावाटपावर बच्चू कडू यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. जो पर्यंत विधानसभेची बोलणी होत नाही तो पर्यंत आम्ही कोणताही विचार केला नाही. भाजपला जशी लोकसभा महत्वाची तशी आम्हाला विधानसभा महत्वाची आहे. लहान पक्षांसोबत अजूनही कोणतीही चर्चा झाली नाही. विधानसभामध्ये किती जागा देणारं हे सांगावं. नाही तर आम्ही स्वतंत्र आहे..आम्हाला कुठलंही बंधन नाही. काँग्रेसमध्ये देखील पानदान झाले आहे. सगळ्या फांद्या तुटल्या आहे.