त्यांना वेड लागलं असेल…; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ दाव्याला देवेंद्र फडणवीस यांचं जोरदार प्रत्युत्तर

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray statement About Maharashtra CM : 2019 ला झालेल्या बैठकीचा दाखला देत उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाबाबत मोठा दावा केला. याला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. नेमकं काय म्हणाले? वाचा...

त्यांना वेड लागलं असेल...; उद्धव ठाकरेंच्या 'त्या' दाव्याला देवेंद्र फडणवीस यांचं जोरदार प्रत्युत्तर
देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Apr 20, 2024 | 6:46 PM

एका मुलाखतीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी 2019 ला आपल्याला एक शब्द दिला होता, असा दावा केला. 2019 ला आदित्यला मुख्यमंत्री बनवून मी दिल्लीला जाईल, असा शब्द देवेंद फडणवीस यांनी मला दिला होता, असं दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. त्याला आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आमचे जुने मित्र उद्धव ठाकरे थोडे भ्रमिष्ट झाले आहेत. त्यांच्या बोलण्यातील तफावत आता लोकांसमोर आली आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. ते अमरावतीत बोलत होते.

“त्यांना वेड लागलं असेल”

आज ते म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं होतं की मी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करेल आणि मी दिल्लीला जाईल. त्यांना वेड लागलं असेल मला तर नाही ना… माझा सवाल आहे, कालपर्यंत यांना भ्रम होत होता. अमित शाहांनी त्यांना कोणत्या तरी खोलीत नेऊन तुम्हाला मुख्यमंत्री करतो असं सांगितलं. हा त्यांचा कालपर्यंतचा भ्रम होता. आता त्यांचा भ्रम बदलला. आता म्हणतात, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आदित्यला मुख्यमंत्री करतो, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

“उद्धवजी आधी ठरवा की…”

उद्धवजी आधी हे ठरवा अमित भाईंनी सांगितलं की देवेंद्रनी सांगितलं. अमित भाईंनी सांगितलं की तुम्हाला मुख्यमंत्री करतो की देवेंद्रनी सांगितलं आदित्यला मुख्यमंत्री करतो. हे भ्रमिष्ट झालंय. खुर्ची गेल्याने त्यांना काहीच सूचत नाही. त्यामुळे एक खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं बोललं जात आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंच्या दाव्यावर भाष्य केलंय.

होय मी त्यांना सांगितलं होतं, आदित्य ठाकरेंना लढवा… कारण तुमचा पक्ष नंतर त्याला सांभाळायाचं आहे. काहीतरी ट्रेनिंग तरी त्याला मिळालं पाहिजे. पण आदित्यला मुख्यमंत्री तर सोडाच पण मंत्री बनवण्याचाही विचार नव्हता… त्यांच्या पक्षांनी त्यांना मंत्री बनवलं नसतं. तर पक्षाची अशी हालत झाली नसती. पण यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की एक तर मी मुख्यमंत्री नाही तर माझा मुलगा मुख्यमंत्री. म्हणूच ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.