Ravi Rana : अमरावतीतील गोळीबार प्रकरण, रवी राणांचा पोलीस आयुक्तांवर निशाणा, गुन्हेगारीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप

| Updated on: Aug 15, 2022 | 3:44 PM

अमरावती शहरातील लक्ष्मीनगरमध्ये अकोला पोलिसांनी हवेत गोळीबार केला. एक हवेत, एका चारचाकी टायरवर असा गोळीबार केला.

Ravi Rana : अमरावतीतील गोळीबार प्रकरण, रवी राणांचा पोलीस आयुक्तांवर निशाणा, गुन्हेगारीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप
रवी राणांचा पोलीस आयुक्तांवर निशाणा
Follow us on

अमरावती : अमरावतीत झालेल्या गोळीबारावर (Firing in Amravati) आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली. रवी राणा म्हणाले, देश स्वतंत्र दिवस साजरा करत असताना अमरावतीत गोळीबार होणं ही देशातील पहिली घटना आहे. अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग या भ्रष्टाचारी आहेत. गुन्हेगाराचा प्रोत्साहन पोलीस आयुक्त वाढवत असल्याचा रवी राणा यांचा आरोप आहे. आरती सिंग या आयपीएस अधिकाऱ्यांसाठी कलंक आहेत. स्वातंत्र्य दिनी अमरावती शहर (Amravati city) सुरक्षित नाही. 17 तारखेला अधिवेशनात पोलीस आयुक्तांची तक्रार करणार असल्याचं राणा म्हणाले. अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग (Aarti Singh) यांचा मी निषेध करतो असंही त्यांनी सांगितलं.

आरोपींनी पोलिसांवर रोखली बंदूक

अमरावती शहरातील लक्ष्मीनगरमध्ये अकोला पोलिसांनी हवेत गोळीबार केला. एक हवेत, एका चारचाकी टायरवर असा गोळीबार केला. आरोपींनी पोलिसांवर बंदूक रोखली. त्यामुळे पोलिसांनी गोळीबार केला. दोन आरोपी चारचाकी घेऊन पळत जाताना इलेक्ट्रॉनिक पोलवर धडक बसली. तेव्हा पोलिसांनी त्यांना पकडले. चार जिल्ह्यातील हे वांटेंड आरोपी होते. त्यांना पकडायला गोपनीय माहितीच्या आधारे अकोला पोलीस अमरावतीला आली होती.

काय आहे प्रकरण

अकोल्यातील आरोपी राजेश राऊत हा अमरावतीला पळून आला होता. अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस त्याचा पाठलाग करत होते. गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लक्ष्मीनगरात आरोपीला पकडत असताना त्याने थेट पोलिसांवर रिव्हाल्व्हर रोखली. त्यानंतर आरोपी राजेश पळून जात होता. पोलिसांनी आरोपीच्या गाडीच्या टायरवर गोळीबार केला. आरोपीची चारचाकी अनियंत्रीत झाली. चारचाकी थेट पोलला धडकली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन गाडगेनगर ठाण्यात आणले. गोपनीय माहितीच्या आधारे अकोला पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला होता. अमरावतीमध्ये आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी अकोला पोलीस दाखल झाले. त्यांच्या हातावर तुरी देऊन आरोपी पळ काढत होते. कुख्यात आरोपीच्या कारवर निशाणा लावत टायरवर पोलिसांनी गोळी झाडली. कारवरील नियंत्रण सुटून गाडी एका पोलवर आदळली. अखेर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

हे सुद्धा वाचा