Amravati Hindu Morcha : महिलांना बंदुक बाळगण्याची परवानगी द्या, बंदुका मी घेऊन देईन, अमरावतीच्या हिंदू मोर्चात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या वक्तव्याने खळबळ

Hindu Morcha : महिलांना बंदुक बाळगण्याची परवानगी द्या, बंदुका मी घेऊन देईन, असे वक्तव्य शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने केल्याने एकच खळबळ उडाली. अमरावती येथे आज हिंदुत्ववादी संघटनांनी विराट हिंदू मोर्चाचे आयोजन केले होते. त्यावेळी केलेल्या वक्तव्याची एकच चर्चा झाली.

Amravati Hindu Morcha : महिलांना बंदुक बाळगण्याची परवानगी द्या, बंदुका मी घेऊन देईन, अमरावतीच्या हिंदू मोर्चात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या वक्तव्याने खळबळ
शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या वक्तव्याने एकच खळबळ
Follow us
| Updated on: Aug 25, 2024 | 3:13 PM

2-4 लोकांचा जीव गेला तरी चालेल, पण वाईट माणूस वाचायला नको. महिलांना बंदुक बाळगण्याची परवानगी द्या, बंदुका मी घेऊन देईन, असे वक्तव्य शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने केल्याने एकच खळबळ उडाली. अमरावती येथे आज हिंदुत्ववादी संघटनांनी विराट हिंदू मोर्चाचे आयोजन केले होते.  शिंदे गटाचे पदाधिकारी नानकराम नेभनानी यांनी हे वक्तव्य केले आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. अशावेळी अमरावतीत केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे. अशा प्रकरणात कोर्ट कचेरीचे कामकाज करावे लागले. त्यासाठी खर्च करावा लागला तरी तो आपण करु असे वक्तव्य नेभनानी यांनी केले.

हिंदूवरील अत्याचाराविरोधात मोर्चा

बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारा संदर्भात आज अमरावतीत सकल हिंदू समाजाच्या वतीने विराट हिंदू मोर्चा आयोजीत करण्यात आला होता. शहरातील नेहरू मैदान ते इर्विन चौकापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चा नेहरू मैदान ते इर्विन चौक या मार्गाने आयोजीत करण्यात आला. विविध हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चात सहभाग होता. या कार्यक्रमात माजी खासदार नवनीत राणा, राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे आणि इतर नेते उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

पण पहिल्यांदा मला रिव्हाल्वर द्या

नानकराम नेभणानी म्हणाले सर्वांना रिव्हाल्वर देतो, सर्वांचे मला माहित नाही पण पहिल्यांदा मला द्या, अशी मागणी खासदार अनिल बोंडे यांनी केली. सर्वांना लढता आलं पाहिजे यासाठी मोदीजींनी अग्निविर सारख्या योजना आणल्या.. पण विरोधक त्याला विरोध करतात. कारण काँग्रेसला भारताचा बांगलादेश करायचा आहे. हिंदूंवर अत्याचार करायचा आहे असा आरोप त्यांनी काँग्रेसवर केला.

बांगलादेशींना कामावर ठेऊ नका

तुमच्या कारखान्यात स्वस्त मजुरी द्यावी लागते म्हणून बांगलादेशातील रोहिंगे यांना ठेवू नका असे आवाहन अनिल बोंडे यांनी व्यापाऱ्यांना केले आहे. मंदिर कोणी तोडले, बुद्धांच्या मूर्ती कोणी तोडल्या त्या बादशाहानी, असं कधी ऐकलं का की कुठल्या हिंदूंना कुठल्या मंदिर मस्जिद वर हल्ला केला. जिथे कुठे मंदिर असेल तिथे सात वाजता सर्वांनी आरतीसाठी एकत्र यावं, प्रवासात असाल तर जवळच्या मंदिरात गोळा व्हा. लव्ह जिहाद लँड जिहाद होत असेल तर धावून जा, असे आवाहन बोंडे यांनी केले आहे. इस्त्रायलमध्ये 90 लाख लोक राहतात पण हा देश सगळ्यांना भारी आहे. कारण इस्त्रायल मधील प्रत्येक माणूस लढत आहे, असे बोंडे म्हणाले.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.