MLA Ravi Rana | अमरावती मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर शाईफेक प्रकरण; राणा दाम्पत्य पोलीस आयुक्तालयात चौकशीसाठी जाणार
खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना आज पोलीस आयुक्त कार्यालयात आपले म्हणणे मांडण्यासाठी बोलाविण्यात आले आहे. आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा पोलीस आयुक्तालयात जाणार आहेत. पोलीस आयुक्त आरतीसिंग व मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांची चौकशी होणार आहे.
अमरावती : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्यात आल्यानंतर मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाइफेक (Shaifek Case) करण्यात आली होती. त्यामुळे आमदार रवी राणा यांच्यावर सुद्धा कलम 307 नुसार आयुक्तांवर प्राणघातक हल्ला प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यामार्फत पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी दाखल केलेल्या 307/353 सारख्या खोट्या गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक (Director General of Police) (कायदा व सुव्यस्थचा) राजेन्द्रसिंग (Rajendrasingh) अमरावतीत दाखल आले आहेत. खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना आज पोलीस आयुक्त कार्यालयात आपले म्हणणे मांडण्यासाठी बोलाविण्यात आले आहे. आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा पोलीस आयुक्तालयात जाणार आहेत. पोलीस आयुक्त आरतीसिंग व मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांची चौकशी होणार आहे.
राजेंद्रसिंग अमरावतीत दाखल
आमदार रवी राणांवर दाखल असलेल्या कलम 307 च्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) राजेंद्रसिंग अमरावतीत दाखल झाले आहेत. आमदार रवी राणा व खासदार राणा नवनीत राणा चौकशीसाठी अमरावती पोलीस आयुक्तांलयात जाणार आहेत. आमदार रवी राणा यांनी ही माहिती दिली आहे. या प्रकरणी आमदार रवी राणा यांना अटकेपासून बचावासाठी बरेच पर्यत्न करावे लागले. अटकेपासून संरक्षण मिळाल्यानंतर ते अमरावतीत दाखल झाले. दिल्लीत असताना अमरावतीत काही घडले असेल, तर त्यात मी आरोपी कसा असा रवी राणा यांचा सवाल आहे. त्यामुळं पोलीस आयुक्तही गुन्हा का दाखल केला, याप्रकरणी गोत्यात आल्या आहेत. त्यामुळंच या प्रकरणाची आता उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे.