Amravati Election Reservation 2022 : अमरावती महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर; जाणून घ्या वॉर्डनिहाय सविस्तर आरक्षण
Amravati Election Reservation 2022 : अमरावती महापालिका निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत जाहीर झाली. महापालिकेच्या 33 प्रभागातील 98 जागांसाठी मंगळवरी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. अमरावती महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी महानगरपालिकेच्या संत ज्ञानेश्वर नाट्यगृहात आरक्षण सोडतीची घोषणा केली.

राज्यात महापालिका निवडणुकांचे (Municipal Elections) वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारविरुद्ध भाजप अशी रंगतदार लढत आगामी पालिका निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने 14 महापालिकांना 31 मेपर्यंत प्रभागनिहाय आरक्षण (Ward wise reservation) सोडत जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोडत प्रक्रिया पार पडली. अशावेळी राज्यातील महापालिकांची आरक्षण सोडत कशी असेल, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. सर्व राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये मुंबई, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिकांचा समावेश आहे. चला तर जाणून घेऊया अमरावती महापालिकेची इत्यंभूत वॉर्डनिहाय आरक्षण.
अमरावती महापालिका आरक्षण सोडत
अमरावती महापालिका निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत जाहीर झाली. महापालिकेच्या 33 प्रभागातील 98 जागांसाठी मंगळवरी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. अमरावती महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी महानगरपालिकेच्या संत ज्ञानेश्वर नाट्यगृहात आरक्षण सोडतीची घोषणा केली. या आरक्षण सोडतीमध्ये 49 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर अनुसूचित जातीसाठी एकूण 17 जागा राखीव असून, यापैकी 9 जागा या एससी महिलांसाठी आहेत. 2 जागा या ST साठी आरक्षीत आहेत. त्यापैकी 1 जागा महिलांसाठी राखीव आहे. तर 39 जागा ओपन महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
मागील निवडणुकीत 22 प्रभागातून 87 सदस्य निवडून आले होते तर यावेळी 33 प्रभागातून 98 सदस्य निवडून दिले जाणार आहेत. महीला आरक्षणामुळे काही निवडणूक इच्छूक उमेदवारांचे गणित बिघडले आहे. तर काहींसाठी मात्र ही आरक्षणाची सोडत सोयीची झाली आहे.
अमरावती महापालिकेतील पक्षीय बलाबल
भाजप – 45
शिवसेना – 7
काँग्रेस – 15
एमआयएम – 10
बीएसपी – 5
रिपाई (आठवले गट )- 1
स्वाभिमानी पार्टी – 3
अपक्ष – 1
एकूण संख्या-87