मुख्यमंत्र्यांना भेटणार, निर्णय झाला नाहीतर सरकारविरोधात उभं राहणार; बच्चू कडू संतापले

Bcchu Kadu on CM Eknath Shinde Talathi Bharti Exam Server Down : मुख्यमंत्र्यांना भेटणार, निर्णय झाला ठीक नाहीतर विरोधात उभं राहू...; बच्चू कडू आक्रमक.तलाठी भरती परिक्षेतील गोंधळावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. म्हणाले,

मुख्यमंत्र्यांना भेटणार, निर्णय झाला नाहीतर सरकारविरोधात उभं राहणार; बच्चू कडू संतापले
Follow us
| Updated on: Aug 21, 2023 | 2:13 PM

अमरावती | 21 ऑगस्ट 2023 : आज तलाठी भरती परीक्षा होणार होती. सकाळी नऊ वाजता पहिला पेपर होणार होता. मात्र त्याआधीच सर्व्हर डाऊन झाल्यानं परिक्षार्थी परिक्षा केंद्रावर खोळंबले. सकाळपासून सर्वर डाऊन असल्याने वेळेवर परीक्षा सुरू न झाल्याने केंद्रावर गोंधळ पाहायला मिळाला. सकाळी 9 वाजता परीक्षा सुरू होणार होती मात्र, सर्वर डाऊन मुळे विद्यार्थ्यांना 10 वाजता परिक्षा केंद्रात सोडण्यात आले. 10.30 वाजता परीक्षा सुरू या सगळ्या गोंधळावर आमदार बच्चू कडू यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भट घेऊन त्यांच्याशी या विषयावर चर्चा करणार असल्याचं बच्चू कडू म्हणाले आहेत.

तलाठी परीक्षा गोंधळावर आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 30 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना परीक्षा गोंधळ संदर्भात भेटणार आहेत. गोंधळ करणाऱ्या कंपनीवर कारवाई झाली पाहिजे. सरकारने जर या बाबतीत मागे-पुढे पाहिलं तर सरकारच्या विरोधात उभं राहू, अशी आक्रमक भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे.

6 महिन्यानंतरच्या सर्व परीक्षा केरळच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घ्या. कोणत्याही परीक्षासाठी विद्यार्थ्यांकडून वर्षाकाठी फक्त 1000 रुपये परीक्षा फी घ्यावी, असंही बच्चू कडू म्हणाले आहेत.

संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनीही या परिक्षेतील गोंधळावर प्रतिक्रिया दिली आहे. सरकारचा नाकार्तेपणा उघड झाला आहे. तलाठी परीक्षेत यंत्रानेकडून सर्व्हर डाऊनचा घोटाळा झाला आहे. राज्यात हजारो विद्यार्थी परीक्षेपासून वंचित आहेत. तरुणांच्या भावनांशी खेळण्याचा हा प्रकार आहे. शेतकऱ्यांच्या पोरांकडून एका तलाठीच्या परीक्षेसाठी एक हजार रुपये वसूल केले गेले. जर परीक्षेत खेळखंडोबा असेल तर याला जबाबदार कोण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे, असं ते संतोष शिंदे म्हणालेत.

आज राज्यभरात तलाठी भरतीची परिक्षा होत आहे. सकाळी नऊ वाजता पहिला पेपर होता मात्र सर्व्हर डाऊन झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं. हा पेपर उशीरा झाला. अमरावती जिल्ह्यात सर्व्हर डाऊन असल्यामुळे तलाठी परिक्षेचा दुपारचा पेपरही दीड तास उशिराने सुरू होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा 2 ते 4 या वेळेत होणार आहे. पहिल्या टप्प्यातील 10.30 ते 12.30 दरम्यान परीक्षा झाली.

आज दुपारी 12.30 ते 2.30 या वेळेत होणाऱ्या तलाठी भरतीच्या पेपरची वेळ बदलण्यात आली आहे. आता हा पेपर 2 ते 4 या वेळेत होणार होणार आहे. पुण्यातील तलाठी परिक्षेच्या सेंटर्सवरही तसे बोर्ड लावले आहेत.

निवडीचे केंद्र न मिळाल्याने मिळालेल्या केंद्रावर विद्यार्थी दाखल झाले. अमरावतीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून हे विद्यार्थी परिक्षा केंद्रावर आले. पण परिक्षेचं वेळापत्रकात बदल झाल्याने विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्तापाला सामोर जावं लागलं. अमरावती जिल्ह्यात एकूण तीन टप्प्यात 8 केंद्रावर 2004 विद्यार्थी परीक्षा देत आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.