“उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त,त्यांचा दबदबा संपला”; भाजप आमदाराची ठाकरेंवर सडकून टीका
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत की कोणीच शिल्लक राहिले नाहीत.त्यामुळे वैफल्याच्या भावनेतूनच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
अमरावती : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना एक अत्यंत फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभला असल्याचा घणाघात त्यांनी केला होता. उद्धव ठाकरे यांच्या टीकेनंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आणि शिवसेना-भाजपवर टीका केल्यानंतर आता भाजप खासदार अनिल बोंडे आक्रमक झाले आहेत. त्यामुळे अनिल बोंडे यांनी उद्धव ठाकरे यांना वैफल्यग्रस्त ठरवून आता त्यांच्याकडे कोणीच नसल्यान ते अशा प्रकारची टीका करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भाजप खासदार अनिल बोंडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर फडतूस गृहमंत्री अशी टीका केल्यानंतर खासदार अनिल बोंडे आक्रमकपणे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्यासह दिग्गज नेते सोडून गेले. त्यांच्यामुळेच उद्धव ठाकरे आता एकटे पडले आहेत. त्यामुळे त्यांना वैफल्य आले आहे. त्या वैफल्यग्रस्तामधूनच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
ठाकरे गटातील अनेक नेते आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होत आहेत. त्यातच सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे यांचा दबदबा संपला असल्याचा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी, मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा घेतल्या आहेत. त्यातच त्यांनी शिवसेना आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांनी त्यांच्या सडकून टीका केली होती.
फडतूस असा शब्द वापरल्याने आता भाजपचे सगळे नेते आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे फक्त सहानुभूती मिळवण्यासाठीच टीका करण्याचे नाटक करत आहेत अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांनी जरी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली असली तरी अकेला देवेंद्र फडवणीस सर्वांना भारी आहेत असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत की कोणीच शिल्लक राहिले नाहीत.त्यामुळे वैफल्याच्या भावनेतूनच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.