बच्चू कडू यांना मोठा धक्का; अमरावतीच्या जागेवर दावा करताच बडा नेता साथ सोडणार?

Ravi Rana on Rajkumar Patel and Prahar : अमरावती लोकसभेच्या जागेवर दावा करताच बडा नेता बच्चू कडू यांची साथ सोडणार?; 'या' वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ. 'तो' नेता खरंच साथ सोडणार? बच्चू कडू नेमकं काय म्हणाले होते? आता रवी राणा यांनी काय दावा केलाय? वाचा सविस्तर...

बच्चू कडू यांना मोठा धक्का; अमरावतीच्या जागेवर दावा करताच बडा नेता साथ सोडणार?
bacchu kaduImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 03, 2024 | 1:16 PM

स्वप्नील उमप, प्रतिनिधी टीव्ही 9 मराठी, अमरावती | 03 जानेवारी 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी अमरावती मतदारसंघावर दावा केला. अमरावतीतून प्रहारचा नेता निवडणूक लढवेल, असं आज सकाळी टीव्ही 9 मराठीशी बोलताना बच्चू कडू यांनी हा दावा केला. त्यानंतर आता प्रहारचा बडा नेता बच्चू कडू यांची साथ सोडणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. आमदार रवी राणा यांनी तसा दावा केला आहे. शिवाय हा बडा नेता शिवसेना किंवा भाजपसोबत जाऊ शकतो, असंही रवी राणा म्हणालेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा होत आहे.

पटेल बच्चू कडू यांची साथ सोडणार?

प्रहारचे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल बच्चू कडूंची साथ सोडणार का?, अशी चर्चा सध्या होत आहे. आमदार रवी राणा यांनी तसा दावा केला आहे. राणा यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राजकुमार पटेल यांची स्वतः ची मतदारसंघात पकड आहे. वैयक्तिक त्यांची पकड चांगली असल्याने ते आमदार झाले, असं राणा म्हणाले.

राजकुमार पटेल आता वेगळ्या वाटेवर आहेत. हे त्यांनाही माहित आहे आणि मलाही माहिती आहे. भाजपची तिकीट मिळाली पाहिजे हे राजकुमार पटेल यांना वाटतंय, असा दावा रवी राणा यांनी केला आहे.  राजकुमार पटेल यांचा भाजपकडे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे कल आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी कुठलाही बदल होऊ शकतो, असं राणा म्हणालेत.अमरावतीची जागा आम्ही मागणार आहोत. हवं तर नवनीत राणा यांनी आमच्या तिकीटावर निवडणूक लढवावी, असं बच्चू कडू यांना सकाळी म्हटलं. त्यानंतर रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“निवडणुकीत एकमेकांना मदत करू”

आपापल्या लोकांना सांभाळून ठेवलं पाहिजे. आपलीच जागा राखून ठेवली पाहिजे. आपली जागा जर धोक्यात असेल तर आपण दुसऱ्यांचा विचार करू शकत नाही. बच्चू कडू लोकसभा निवडणुकीमध्ये आम्हाला ताकदीने साथ देतील. आम्ही देखील विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना ताकदीने साथ देऊ, असंही रवी राणा यांनी यावेळी म्हटलं.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.