आरती सिंगांचे अमरावतीत वसुली पथक; रवी राणांचे पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
ज्या संघटनांनी राणा दांपत्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, त्या संघटना अमरावती शहराच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी या संघटना कुठे होत्या असा सवालही राणा यांनी उपस्थित केला आहे.
अमरावतीत पोलीस अधिकारी म्हणून आरती सिंग आल्यापासून शहरात वसुली पथकांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आरती सिंग पोलीस अधिकारी असल्यामुळेच नवनीत राणा यांच्याविरोधात मूठभर संघटना घेऊन राणा दांपत्याविरोधात पोलीस तक्रार दाखल केली जात आहे. त्यामुळे ज्यावेळी अमरावती शहरात आरती सिंगांच्या त्रासाला कंटाळून ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले त्यावेळी या संघटना कुठे गेल्या होत्या असा सवाल आमदार रवी राणा यांनी केला आहे. ज्या संघटनांनी राणा दांपत्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, त्या संघटना अमरावती शहराच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी या संघटना कुठे होत्या असा सवालही राणा यांनी उपस्थित केला आहे.