पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मेमरी लॉस्ट झालीय… राहुल गांधी असं का म्हणाले?; अमरावतीतील सभेतून हल्ला काय?

Rahul Gandhi on PM Narendra Modi : अमरावतीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा होत आहे. या सभेतून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. यंदाची ही विचारधारेची लढाई आहे, असंही राहुल गांधी म्हणालेत. वाचा सविस्तर...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मेमरी लॉस्ट झालीय... राहुल गांधी असं का म्हणाले?; अमरावतीतील सभेतून हल्ला काय?
नरेंद्र मोदी, राहुल गांधीImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Nov 16, 2024 | 1:22 PM

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होतेय. प्रचाराचे अवघे दोन दिवस राहिलेत. अमरावतीत आज महाविकास आघाडीची सभा होत आहे. या सभेला काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मेमरी लॉस्ट झालीय, असं राहुल गांधी म्हणाले. देशात विचारधारेची लढाई आहे. भाजप आणि पंतप्रधान हे बंद खोलीत बसून संविधानाची हत्या करत आहेत, अशा शब्दात राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तसंच भाजपवर बोलताना राहुल गांधी यांनी उद्योगपती गौतम अदानी यांचा उल्लेख केला.

नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा

नरेंद्र मोदी म्हणतात राहुल गांधी हे आरक्षण विरोधात आहे. माझ्या बहिणीने भाषण ऐकलं. ती म्हणाले, जे आम्ही बोलतो तेच मोदी आजकाल बोलत आहेत. कदाचित स्मृतीभ्रंश झाला असावा. अमेरिकेचा एक माजी राष्ट्रपती होता. तो कधी काय बोलायचा आणि कधी काय बोलायचा. त्यावेळी त्यांना सांगावं लागायचं असं नाही असं बोला. एकदा युक्रेनच्या राष्ट्रपतीला अमेरिकाचा माजी राष्ट्रपती रशियाचा राष्ट्रपती म्हणून बोलू लागला. तसंच आपल्या पंतप्रधानांची मेमरी लॉस होत आहे. पुढच्या मिटिंगमध्ये म्हणतील महाराष्ट्रातील सरकार प्रती क्विंटल सात रुपये सोयाबीन देत आहे, अशा शब्दात राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

ही विचारधारेची लढाई आहे. एकीकडे काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी आहे तर दुसरीकडे भाजप, संघ आहे. देश संविधानाने चालला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. पण पंतप्रधान म्हणतात हे रिकामं पुस्तक आहे. यात काही लिहिलं नाही. हे पुस्तक केवळ संघाच्या कार्यकर्त्यांसाठी रिकामं आहे. भाजपसाठी आहे. आमच्यासाठी संविधान हे देशाचा डीएनए आहे. यात आंबेडकर, फुले, शिवाजी महाराज, शाहू महाराज, बुद्ध, नारायण गुरू, बसवण्णा, महात्मा गांधी यांचे विचार आहेत. हे आमच्यासाठी नवं पुस्तक नाही. तर हा हजारो वर्षांपासूनच्या विचारधारेचा दस्ताऐवज आहे. त्यासाठी लोक लढत आहेत, मरत आहेत, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

अदानींचं नाव घेत हल्लाबोल

भाजप आणि पंतप्रधान हे बंद खोलीत बसून संविधानाची हत्या करत आहेत. जेव्हा महाराष्ट्रातील जनतेची सरकार चोरी केली गेली. त्या मिटिंगमध्ये अदानी, अमित शाह बसले. सरकार चोरी करण्याची मिटिंग होती. त्यात निर्णय घेण्यात आला, की आमदारांना विकत घ्यायचे. कोट्यवधीत खरेदी करायचं. जेव्हा अमित शाह आणि भाजपच्या लोकांनी मिटिंग केली. तुमचं सरकार खरेदी करून विकत घेतलं, ही काय संविधानाची सुरक्षा आहे. सरकार चोरलं पाहिज हे काय संविधानात लिहिलं काय. हे सरकार धारावीसाठी चोरण्यात आलं होतं. भाजपचे लोक, मोदी, शाह धारावीची जमीन महाराष्ट्रातील गरीबांची जमीन एक लाख कोटीची जमीन आपले मित्र गौतम अदानीला द्यायची होती. त्यामुळे महाराष्ट्राची सरकार तुमच्या हातून चोरलं. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, असं म्हणत राहुल गांधी यांनी हल्लाबोल केल आहे.

जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.