काँग्रेसच्या महिला आमदाराचा अजित पवार गटात प्रवेश निश्चित?; दादांच्या दौऱ्यादरम्यान चर्चांना उधाण

Sulbha Khodke will enter Ajit Pawar Group : काँग्रेसच्या नेत्या अमरावती मतदारसंघाच्या आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं आहे. अमरावतीत लागलेल्या पोस्टरमुळे चर्चांना उधाण आलं आहे. पोस्टरवर काय मजकूर आहे? वाचा सविस्तर...

काँग्रेसच्या महिला आमदाराचा अजित पवार गटात प्रवेश निश्चित?; दादांच्या दौऱ्यादरम्यान चर्चांना उधाण
अजित पवार, उपमुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Sep 26, 2024 | 11:45 AM

विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. या निवडणुकीसाठी सगळ्याचं पक्षांनी तयारी सुरु केली आहे. जास्तीत जास्त उमेदवार निवडूण आणण्यासाठी रणनिती आखली जात आहे. जागावाटप आणि स्थानिक राजकीय समिकरणं पाहता दुसऱ्या पक्षातील नेत्यांना घेतलं जात आहे. अनेक मतदारसंघात पक्षांतर सुरु आहे. अशातच काँग्रेसमधील एक महिला आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अमरावतीच्या काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके या लवकरच अजित पवार गटात प्रवेश करतील असं बोललं जात आहे.

सुलभा खोडके अजित पवार गटात प्रवेश करणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावती दौऱ्यावर असताना काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांनी लावले अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर लागले आहेत. अजित पवारांच्या बॅनरमुळे शहरात एकच चर्चा होत आहे. काँग्रेसचे आमदार सुलभा खोडके या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्‍यता टीव्ही 9 ने कालच दर्शवली होती. आता या बॅनरमुळे काँग्रेसचे आमदार सुलभा खोडके या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश करणार असल्याचं निश्चित होत आहे. आमदार सुलभा खोडके यांच्या अमरावती विधानसभा मतदारसंघातील आज अनेक विकासकामांच्या भूमिपूजनासाठी उपस्थित अजित पवार राहणार आहेत.

याआधीही अजित पवार यांनी पक्षाच्या बैठकीत सुलभा खोडके या राष्ट्रवादीसोबत असल्याचं म्हटलं होतं. तर आता सुलभा खोडके यांनी अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर लावले आहेत. त्यामुळे त्यांचा पक्ष प्रवेश निश्चित झाल्याचं बोललं जात आहे.

अजित पवारांचा अमरावती दौरा

उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावती दौऱ्यावर आहेत. अजित पवारांच्या या दौऱ्यादरम्यान स्वागताचे बॅनर सुलभा खोडके यांच्याकडून लावण्यात आले आहेत. अमरावती विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांचं अजित पवार उदघाटन करणार आहेत. अमरावती शहरातील जलशुद्धीकरण केंद्र तपोवन मधील वाढीव पाणी पुरवठा योजनाचे 865 कोटी रुपयांचा अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. 865.26 कोटींच्या अमृत- 2, सारथी केंद्र, डफरीन नूतन इमारत, क्रीडा मैदान, विविध विकास कामांची कोनशिला ठेवणार येणार आहे. अजित पवारांच्या या कार्यक्रमाला आमदार सुलभा खोडके उपस्थित आहेत. पण खोडके वगळता इतर लोकप्रतिनिधीची गैरहजेरी आहे.

जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.