Video : अनिल बोंडे पोलिसांवर पुन्हा भडकले! आवाज चढवत म्हणाले ‘कोण बोलतेय ती?’
कधी ते विरोधी पक्षातल्या नेत्यांना आरेतुरे करतात. तर कधी अधिकाऱ्यांशी वाद घालतात. गेल्या काही दिसांपूर्वीच एका पोलीस अधिकाऱ्याला कुत्रा (Anil Bonde vs Police) म्हणाल्याने ते वादात सापडले होते. आता पोलिसांवर भडकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
मुंबई : भाजपचे नेते आणि माजी मंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) त्यांच्या वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असात. कधी ते विरोधी पक्षातल्या नेत्यांना आरेतुरे करतात. तर कधी अधिकाऱ्यांशी वाद घालतात. गेल्या काही दिसांपूर्वीच एका पोलीस अधिकाऱ्याला कुत्रा (Anil Bonde vs Police) म्हणाल्याने ते वादात सापडले होते. आता पोलिसांवर भडकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका महिला पोलिसावर बोंडे पोलीस स्टेशनमध्येच भडकले. ओ मॅडम गप्प बसा, कोण बोलतेय ती? असा भडकत सवाल बोंडेंनी केला (Anil Bonde Viral Video). त्यानंतर बोलणाऱ्याचे तोंड दाबू नका असेही बोंडे म्हणाले. परतवाडा मधील दोन गटात झालेले हाणामारी प्रकरणी बोंडेंनी त्यांची भेट घेतली. याचवरून अनिल बोंडेंसह भाजप पदाधिकारी पोलिसांच्या भेटीला गेले होते. त्यावेळी हा प्रकार घडलाय. अनिल बोंडेंचा हा प्रकार नवा जरी नसला तरी यावरून पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
काही महिन्यांपूर्वी काय घडलं?
काही दिवसांपूर्वी अनिल बोंडें यांनी महिला पोलीस अधिकाऱ्यांशी वाद घातला. तर त्याआधी काही महिन्यांपूर्वी अनिल बोंडें यांनी पोलिृीस निरीक्षकाला चक्क कुत्रा म्हटले होते. काही दिवसांपूर्वी एमपीएससीची परीक्षा सरकारने अचानक पुढे ढकली त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. अमरावती शहरात देखील विद्यार्थ्यांनी चक्काजाम केला. आंदोलन मागे घेण्याबद्दल पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना म्हटले असता वाद निर्माण झाला. याच आंदोलना दरम्यान माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे तेथे पोहोचले. त्यांचाही पोलिसांसोबत वाद झाला. यावेळी डॉ. अनिल बोंडे यांनी ‘तुम्ही सरकारचे कुत्रे आहात’, असे पोलिसांना म्हटले. त्यानंतर पोलिसांनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिले होते.
बोंडे अनेकदा वक्तव्याने वादात
आजपर्यंत बोंडे अनेकदा वादात सापडले आहेत. आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनिल बोंडे अनेकदा वादात सापडल्याचे प्रकार समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच नाना पटोलेंनी मोदींबाबत केले वक्तव्य आणि त्यांनंतर भाजप आक्रमक झाली होती. राज्यभरात भाजप नेते नाना पटोलेंवर तुटून पडले होते. यावेळीही अनिल बोंडे त्यांच्या वक्तव्याने अडचणीत आले होते. नाना पटोलेंना मारण्याची भाष बोंडे यांनी केली होती. तर बोटं झाटीन असा सज्जड दमही भरला होता. बोंडेंच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसही आक्रमक मोडमध्ये आली होती. त्यांन तक्रार दाखल केल्यानंतर बोंडेंविरोधात चौकशीचे आदेशही निघाले होते. मात्र ते प्रकरण शांत झालं नाही, तोवर बोंडेंचा हा पुन्हा नवा वाद समोर आला आहे.