Anil Bonde : खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा अमरावतीत दाखल होताच अनिल बोंडेंचं जंगी स्वागत, ठाकरे सरकारवरही डागली तोफ

. दिवसभर झालेल्या स्वागतांनी मी भारावून गेलो अशी प्रतिक्रिया अनिल बोंडे यांनी ठिकठिकाणी झालेल्या स्वागतानंतर दिली आहे. तसेच त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांनाही काही कानमंत्र दिले आहेत.

Anil Bonde : खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा अमरावतीत दाखल होताच अनिल बोंडेंचं जंगी स्वागत, ठाकरे सरकारवरही डागली तोफ
खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा अमरावतीत दाखल होताच अनिल बोंडेंचं जंगी स्वागत, ठाकरे सरकारवरही डागली तोफImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 11:25 PM

अमरावती : राज्यसभा निवडणुकीत (Rajyasabha Election) दणदणीत विजयानंतर खासदार अनिल बोंडे (Anil Bonde)आज पहिल्यांदा अमरावतीत दाखल झाले. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. हे स्वागत एकाच ठिकाणी झालं नाही तर अनेक ठिकाणी झालं. यावेळी अनिल बोंडे यांनी अमरावतीतून पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. अनिल बोंडेचे त्यांच्या निवासस्थानी कुटुंबीयांकडून जंगी स्वागत करण्यात आलं. या स्वागतावेळी खासदार अनिल बोंडेंनीही कुटुंबासह ढोलताशावर ठेका धरल्याचे दिसून आले. तसेच बहीण संगीता शिंदे यांनी भाऊ अनिल बोंडेंचे यावेळी औक्षण केलं. दिवसभर झालेल्या स्वागतांनी मी भारावून गेलो अशी प्रतिक्रिया अनिल बोंडे यांनी ठिकठिकाणी झालेल्या स्वागतानंतर दिली आहे. तसेच त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांनाही काही कानमंत्र दिले आहेत.

चांगला नेता आणि चांगला झेंडा हवा

राज्यसभा निवडणूकित भाजपच्या तिन्ही उमेदवारांची जबाबदारी पक्षाने घेतली. आम्हाला शेवटपर्यंत माहीत नव्हतं कोणाला किती मतांचा कोटा मिळाला? आता जिल्ह्यात युती कोणाशी नाही, आपण स्वबळावर निवडणुका लढवू, अशी हाक त्यांनी यावेळी दिली. तसेच  स्वतःचा अहंकार सोडून मी कोण आहे हे विसरुन पक्षासाठी काम करा. नाहीतर आपलेच लोक आपला पराभव करतात, असा सल्ला अनिल बोंडे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. तर आपला एक उमेदवार पडला असता तर संजय राऊत काय बोलले असते हा विचार करा. विजय खेचून आणायचा असेल तर आपल्याला मधील मी पणा विसरायचा, असेही ते म्हणाले. युद्ध जिंकायला चांगला नेता पाहिजे, चांगला झेंडा पाहिजे, असे म्हणत त्यांनी फडणवीसांचं कौतुकही केलं आहे.

अनेक ठिकाणी जंगी स्वागत

भाजपचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अनिल बोंडें भाजप कार्यालयात पोहोचले तेव्हाही त्यांचं त्याठिकाणी स्वागत करण्यात आलं. अगदी शहरात अगमन होताच  शेकडो कार्यकर्त्यांनी फटाके, बँड वाजवत त्यांची मिरवणूकही काढली. यावेळी एक वेगळेपण दिसून आले ते म्हणजे रूंगणे घेऊन एक शेतकरी त्यांच्या स्वागताला आलेला दिसला. त्यानंतर अनिल बोंडे यांनी गुरुकुंज मोझरीत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचे दर्शन घेतले. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने ग्रामगीता देऊन खासदार डॉ अनिल बोंडे यांचा सन्मानही करण्यात आला.

महाविकास आघाडीवर पुन्हा सडकून टीका

अनिल बोंडे अमरावतीत दाखल होताच त्यांनी महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेवर निशाणा साधला आहे. मंत्र्यांना मुख्यमंत्री भेटत नसल्याची टीका अनिल बोंडे यांनी केली आहे. लहान पक्षातील आणि अपक्ष आमदार देखील महाविकास आघाडी सरकारला कंटाळले असल्याचे देखील त्यांनी वक्तव्य केल आहे. महा विकास आघाडी सरकारमधील मंत्री आमदार काम घेऊन गेल्यास त्याला कमिशन मागतात. सर्वसामान्य लोकांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मात्र शंभर कोटी जमा करायला त्यांच्याकडे वेळ आहे. अशी बोचरी टीका खासदार अनिल बोंडे यांनी केली आहे.

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.