Anil Bonde on Anil Parab | अनिल परबांना एसटी कर्मचाऱ्यांचा तळतळाट लागला, अनिल बोंडे यांची टीका

ज्या व्यक्तीने एक लाख एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना छळलं त्याची कळ अतुल लोंढे तुम्ही घेऊ नका. तुम्हाला फटका बसणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अतुल लोंढे यांच्या घरात कुठे धाड पडत आहे. जे चांगले असतील त्यांनी कमावलं नाही. ज्यांनी भ्रष्टाचार केला नाही त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही, असंही अनिल बोंडे यांनी स्पष्ट केलं.

Anil Bonde on Anil Parab | अनिल परबांना एसटी कर्मचाऱ्यांचा तळतळाट लागला, अनिल बोंडे यांची टीका
अनिल बोंडे, अनिल परब,Image Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 12:38 PM

अमरावती : भाजपचे नेते अनिल बोंडे म्हणाले, पापाची पायरी भरली की भोगावच लागतं. परिवहन मंत्री अनिल परब हे मस्तीत आणि गुरमीत होते. ईडीच्या छापेमारीनंतर अनिल बोंडे यांनी अनिल परबांवर जोरदार टीका केली. अनिल बोंडे म्हणाले, या कारवाईमुळे एसटी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाच्या मनाला थंडक मिळाली. एसटी कर्मचाऱ्यांच्या विधवा पत्नीचे व कुटुंबाची हाय अनिल परब यांना लागली आहे. शिवसेनेने (Shiv Sena) म्हणू नये की मराठी माणूस असल्याने कारवाई होत आहे. अनिल परब यांच्या बांद्रा, दापोली (Bandra, Dapoli) येथील निवासस्थानासह सात ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू आहे. आज सकाळी सहा वाजतापासून ईडीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केली. परबांच्या घरी चार अधिकाऱ्यांचे पथक आहे. एक पथक पुण्यातही पोहचले. अनिल परब यांनी 2017 मध्ये दापोलीतील 42 गुंठे जागा घेतली. त्यानंतर झालेल्या व्यवहारात कागदपत्रांवर विभास साठे नावाने बनावट स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. त्यासाठी अनिल परब यांच्या मंत्रीपदाचा उपयोग केला गेला, असा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (former BJP MP Kirit Somaiya) यांनी केला.

भ्रष्टाचार न करणाऱ्यांनी घाबरू नये

अनिल परब यांच्या समर्थनार्थ काही नेते रस्त्यावर येत आहेत. ही कारवाई कशी चुकीची आहे. हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांच्याबाबत बोलताना अनिल बोंडे म्हणाले, ज्या व्यक्तीने एक लाख एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना छळलं त्याची कळ अतुल लोंढे तुम्ही घेऊ नका. तुम्हाला फटका बसणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अतुल लोंढे यांच्या घरात कुठे धाड पडत आहे. जे चांगले असतील त्यांनी कमावलं नाही. ज्यांनी भ्रष्टाचार केला नाही त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही, असंही अनिल बोंडे यांनी स्पष्ट केलं.

कर्मचाऱ्यांचा तळतळाट लागला

परिवहन मंत्री असताना अनिल परबांना एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय केला. कर्मचाऱ्यांनी आंदोलन करूनही त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही. याला सर्वस्वी जबाबदार हे अनिल परब होते. या सर्व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचा तळतळाट लागला अशी टीका अनिल परब यांच्यावर अनिल बोंडे यांनी केली.

हे सुद्धा वाचा

...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.