औरंगाबाद : औरंगाबाद (Aurangabad Double murder case) शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली होती. पुंडलिक नगर परिसरात पती आणि पत्नीची (Husband wife murder) हत्या झाल्यानं एकच खळबळ उडालेली. ही हत्या त्यांच्याच मुलानं केली असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. दोघांचेही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर औरंगाबादेतील दुहेरी हत्याकांडाचं गूढ वाढलं होतं. 55 वर्षांचे शामसुंदर हिरालाल कलंत्री आणि 45 वर्षांची त्यांची पत्नी किरण शामसुंदर कलंत्री अशी मृतांची नावे आहेत. मृतदेह घराबाहेर काढण्याची प्रक्रिया सोमवारी सुरु करण्यात आली होती. प्राथमिक अंदाजानुसार, नातेवाईकांनीच या दोघांची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. आता या हत्याकांडाचा (Aurangabad Crime) उलगडा झाला असून मुलानंच आपल्या आईवडिलांचा खून केल्याचा खळबळजनक खुलास करण्यात आलाय. हा खून अत्यंत नियोजनपूर्वक केल्याचंही दिसून आलंय. खूनानंतर दोघांचेही मृतदेह वेगवेगळ्या मजल्यावर ठेवण्यात आले होते. पलंगाखाली हे मृतदेह ठेवल्यामुळे काही काळ फारसं कुणाला कळलं नाही. मात्र मृतदेह कुजल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला होता.
दुकानातली रक्कम चोरून एका महिलेला देत असल्याचा संशय घेत मुलगा आणि आई-वडिलांमध्ये वाद झाला. याच वादातून संतापलेल्या मुलानं आपल्याच आई-वडिलांचा जीव घेतलाय. याप्रकरणी मुलानं हत्येची कबुलीदेखील दिली आहे.
कॉलेजमध्ये शिकणाऱ्या बहिणीला देवेंद्रेचे वडील सोडायला गेले होते. ही संधी साधून देवेंद्रनं आपल्या सावत्र आईवर सपासप वार केले आणि तिचा काटा काढला. यानतंर आईच मृतदेह त्यानं दिवाणात लपवला होता. नंतर वडील आल्यानंतर त्यांचीही देवेंद्रने निर्घृण हत्या केली. सोमवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली होती.
देवेंद्र वडिलांना दुकान चालण्यासाठी मदत करत होता. पण गल्ल्यातले पैसे काढून घेत असल्यानं त्याचे वडिलांसोबत सतत वाद सुरु होते. शुक्रवारी संध्याकाळी त्यांनी सातशे रुपयांची नोंद वहीत करुन घेतली. मात्र हे पैसे गल्ल्यात न टाकत परस्पर काढले. यावरुन सावत्र आईसोबत त्याचा वाद झाला होता. या वादातून दुहेरी हत्याकांड घडलं.
दरम्यान, बहिणीला कॉलेजमध्ये सोडून घरी आलेलया वडिलांवरही देवेंद्रने हल्ला केला आणि त्यांचा काटा काढला. यानंतर बहिणीला फोन करुन वडिलांच्या आवाजात तिच्याशी देवेंद्र बोलला.
वडिलांच्या धुळ्यातील मित्राचा मृत्यू झाल्यानं आम्ही तिघे तिथे जातोय. त्यामुळे तू काकूंच्या घरी जा, असं देवेंद्रने आपली बहीण वैष्णवीला सांगितलं. दोन दिवस वडिलांशी बोलण्यासाठी वैष्णवी फोन करत होती, पण देवेंद्रच वडिलांच्या आवाजात तिच्याशी बोलला.
यानंतर वैष्णवी अखेर घरी आल्यानंतर तिला घराला कुलूप दिलसं. त्यानंतर तिने कुलूप तोडण्याचा प्रयत्नही केला. कुलूप न तुटल्यानं तिनं गच्चीवरुन घराच्या खिडकीतून प्रवेश केला. तेव्हा वैष्णवीला जिन्यावर रक्ताचे डाग दिसले. हे डाग पाहून वैष्णवी हादरली आणि नंतर या सगळ्याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी येऊन दरवाजाचं कुलूप फोडलं आणि त्यानंतर या दुहेरी हत्याकांडाची खळबळजनक घटना उघडकीस आली. यानंतर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत आरोपी देवेंद्र कलंत्री याला अटक केली आणि त्याला शिर्डीहून औरंगाबादेत आणलं.
या संपूर्ण घटनेनंतर पुंडलिकनगर हादरुन गेलं होतं. मोठ्या संख्येनं बघ्यांची गर्दी या ठिकाणी झाली होती. तर लहान भावाचा खून झाल्याचं कळळ्यानंतर कलंत्री यांचे मोठे बंधू माणकचंद यांना मोठा धक्का बसला होता.
हत्या करण्यात आलेल्या श्यामसुंदर यांचे तीन विवाह झाले होते. त्यांच्या पहिल्या पत्नी मुलगा देवेंद्र यानं हे हत्याकांड केलं होतं. श्यामसुंदर यांच्या पहिल्या पत्नीचा आजारपणामुळे मृत्यू झाला होता. दुसऱ्या पत्नीनं दागिने चोरी घरातून पळ काढला होता. त्यानंतर श्यामसुंदर यांनी 2000 साली अश्विनी यांच्यासोबत तिसरं लग्न केलं होतं. तिसऱ्या पत्नीपासून श्यामसुंदर यांना वैष्णवी ही मुलगी झाली होती.