VIDEO : करौली बाबानंतर आता तव्यावर बसलेल्या बाबाची सोशल मीडियावर चर्चा, कोण आहे हा बाबा?

सध्या सोशल मीडियात एका बाबाची जोरदार चर्चा सुरु आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही चकित व्हाल.

VIDEO : करौली बाबानंतर आता तव्यावर बसलेल्या बाबाची सोशल मीडियावर चर्चा, कोण आहे हा बाबा?
गरम तव्यावर बसणारा बाबा सोशल मीडियात व्हायरलImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 25, 2023 | 1:54 PM

अमरावती / स्वप्नील उमप : करौली बाबानंतर आता अमरावतीतील गरम तव्यावर बसणाऱ्या बाबाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मार्डी येथील एका महाराजचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. यामध्ये एक महाराज चक्क अग्नीवर ठेवलेल्या तव्यावर बसलेला दिसत आहे. तव्यावर बसलेला व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. संत गुरुदास महाराज असे तव्यावर बसलेल्या बाबाचे नाव आहे.

मार्डी येथे आहे बाबाचं आश्रम

मार्डी येथे संत गुरुदास महाराज यांचं गौररक्षण असून, तेथे या महाराजचा आश्रम आहे. गरम तव्यावर बसून व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याबाबत संत गुरुदास महाराज यांची प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतली. सदर व्हिडिओ हा महाशिवरात्रीतला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर मी कुठलेही अंधश्रद्धेचे काम करत नाही. मला दैवी शक्ती प्राप्त होते, त्यावेळी मला भान नसतं. मी अंधश्रद्धा पसरवत नाही, हा श्रद्धेचा भाग आहे. मी साधू संत नाही, असा दावा त्यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे व्हिडिओमध्ये?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये संत गुरुदास महाराज हे गरम तव्यावर बसले आहेत. तव्याखाली चूल पेटत आहे आणि बाबा त्या चुलीवर ठेवलेल्या तव्यावर बसले आहेत. बाबांच्या एका हातात विडी आहे. विडी ओढत ओढत बाबा पाया पडायला येणाऱ्या भक्तांना आशिर्वाद देत आहेत.

चमत्कार आमच्यासमोर सिद्ध करावा, अंनिसचे आवाहन

महाराजांचा चमत्कार खरा असेल तर त्यांनी तो आमच्यासमोर सिद्ध करावा. आम्ही 30 लाखांचं त्यांना बक्षीस देऊ नाही तर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंतर्गत कारवाई व्हावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हरीश केदार यांनी केली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.