उद्धव ठाकरे यांच्यामुळे यांना संजीवनी मिळेल, बच्चू कडू यांची खोचक टीका

उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या भेटीची चर्चा सुरू आहे. यावरून बच्चू कडू यांनी टोला लगावला.

उद्धव ठाकरे यांच्यामुळे यांना संजीवनी मिळेल, बच्चू कडू यांची खोचक टीका
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 14, 2023 | 6:10 PM

अमरावती : शिंदे गट शिवसेनेतून वेगळा झाल्यापासून उद्धव ठाकरे गट कमकुवत झाला आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून सभा घेतल्या जात आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीचे पहिली सभा झाली. या सभेला काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले अनुपस्थित होते. त्यानंतर आता दुसरी महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा नागपुरात होत आहे. या सभेत काँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित येतील. १६ एप्रिल रोजी ही सभा होणार आहे.

बच्चू कडू हे उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. तरीही ते शिंदे यांच्यासोबत आले. प्रहार संघटनेचे ते प्रमुख नेते आहेत. या माध्यमातून ते विदर्भात काम करत आहेत. महाविकास आघाडी एकत्र असली तर यातून फायदा हा काँग्रेसला होईल. यातून ठाकरे गटाला फार काही मिळणार नाही, असं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलं. वज्रमुठ सभा नागपुरात होत आहे. या सभेत तिन्ही पक्षांचे कोणते नेते उपस्थित राहतील, हे दोन दिवसांतच स्पष्ट होईल.

हे सुद्धा वाचा

यांना मिळेल संजीवनी

उद्धव ठाकरे यांच्यामुळे काँग्रेसला संजीवनी मिळेल. असा टोला बच्चू कडू यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या भेटीची चर्चा सुरू आहे. यावरून बच्चू कडू यांनी हा टोला लगावला. संजीवनी उद्धव गांधी यांच्या रुपाने मिळेल, अशी राहुल गांधी यांना अपेक्षा असेल. पण, राहुल गांधी यांच्या पदयात्रेनंतर सामान्य व्यक्तीवर काही फरक जाणवला नाही.

काँग्रेसचे कार्यकर्ते फुटायला लागले

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरही पदयात्रेचा फरक पडला नाही. त्यांनी पदयात्रा काढल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते फुटायला लागले. राहुल गांधी यांच्या पदयात्रेचा काही परिणाम होईल, असं वाटत होतं. पण, तो काही झालेला दिसला नाही. त्यामुळे जनतेवर कसा परिणाम होईल, हा सवाल असल्याचं बच्चू कडू म्हणाले.

जनतेवर कसा परिणाम होणार?

शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्या भेटीकरिता काँग्रेस नेते राहुल गांधी मातोश्रीवर येणार आहेत. या भेटीच्या पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीत खोचक प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा त्यांच्या कार्यकर्त्यांवरच परिणाम पडला नाही तर जनतेवर कसा पडणार? असा सवाल उपस्थित केला. शिवसेनेमुळे काँग्रेसला नव संजीवनी मिळत असेल तर ही चांगली गोष्ट असल्याचेही यावेळी कडू म्हणाले.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.