अमरावती : अमरावतीमधील युवा स्वाभिमानचे आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bachu Kadu) यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांच्या किराणा वाटपावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केले. रवी राणा यांनी केलेल्या आरोपानंतर आमदार बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. आमदार रवी राणा यांनी बदनामी केली असल्याचा आरोप करत बच्चू कडू यांनी केला. रवी राणांविरोधात अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
आमदार रवी राणा यांनी माझी बदनामी केली आहे. 20-20 वर्षे आम्ही राजकीय करिअर उभं करायला गेलं आहेत. मी पैसे घेऊन जर गुवाहाटीला गेलो असेल तर पैसे देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदेजी यांनी दिले असतील. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देखील नोटीस पाठवणार आहोत का. तुम्ही पैसे दिले असेल तर स्पष्ट करा, असं बच्चू कडू म्हणाले.
आमदार रवी राणा यांनी आरोप केले तर पुरावे द्यावे. हा लहान विषय नाही आहे. आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून सांगता. दुसरीकडे स्वतः मंत्रिपदाच्या रांगेत उभे राहता असा टोला बच्चू कडू यांनी लगावला. आता आरपारची लढाई लढायला मी तयार आहे.
जिथे म्हणाल तिथे एकटा यायला तयार आहे, असं खुल आव्हान बच्चू कडू यांनी रवी राणा यांना दिलं आहे. आमदार रवी राणा यांनी केलेले तोडपानीचे आरोप त्याचे पुरावे एक तारखेपर्यंत पुरावे द्या. पुरावे दिले तर मी त्याच्या घरी भांडे घासेन. नाही दिले तर त्यांना कायमचा हिजडा म्हणेल असं बच्चू कडू म्हणाले.