अमरावती : अमरावती पदवीधर निवडणुकीचा निकाल (Amravati MLC election result) अतिशय आश्चर्यकारक असा लागला आहे. भाजपचे महाराष्ट्रातील एक नंबरचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे अतिशय जवळचे नेते रणजित पाटील (Ranjit Patil) यांचा अमरावती पदवीधर निवडणुकीत पराभव झालाय. महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी या निवडणुकीत बाजी मारली आहे. ही निवडणूक अतिशय अटीतटीची ठरली. पण या लढतीत अखेर धीरल लिंगाडे (Dhiraj Lingade) यांनी बाजी मारलीय. विशेष म्हणजे रणजित पाटील हे महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री आहेत. ते याच मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात ते राज्यमंत्री होते. देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वासू म्हणून त्यांची ख्याती आहे. पण तरीही त्यांचा या निवडणुकीत पराभव झाल्याने भाजपसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय.
विधान परिषदेच्या दोन पदवीधर आणि तीन शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल कालपासून समोर येतोय. या निवडणुकीत अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निकालाबाबत शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स कायम राहिला. विशेष म्हणजे चार जागांचे निकाल कालच जाहीर झाले होते. पण अमरावतीच्या जागेसाठीचा सस्पेन्स कायम होता.
रणजित पाटील यांनी फेरमोजणीची मागणी केली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून फेरमोजणी करण्यात आली. या सगळ्या कार्यप्रणालीला तब्बल 30 तासांपेक्षा जास्त कालावधी लागला. अखेर अमरावती पदवीधर मतदारसंघाचा निकाल जाहीर झालाय. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे धीरल लिंगाडे विजयी झाले आहेत.
विशेष म्हणजे या निवडणुकीत नाशिकच्या जागेकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. पण नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचा विजय निश्चित असल्याचं चित्र आज दुपारीच स्पष्ट झालं होतं. तरीही मतमोजणी सुरुच होती.
दुसरीकडे अमरावीत मतदारसंघाची निवडणूक इतकी अटीतटीची ठरेल अशी कुणी कल्पनादेखील केली नव्हती. अखेर या अटीतटीच्या लढतीत महाविकास आघाडीचे उमेदवार धीरल लिंगाडे यांनी बाजी मारली आहे.
रणजित पाटील हे माजी गृहराज्यमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू अशीदेखील त्यांची ओळख आहे. फडणवीस यांनी रणजित पाटील यांना महाराष्ट्रात दिलेली कोणतीही कामगिरी असो, ती त्यांनी फत्ते पाडली आहे. पण या निवडणुकीत फडणवीसांच्या या शिलेदाराला पराभवाचा सामना करावा लागला.
रणजित पाटील यांच्या पराभवामागील सर्वात मुख्य कारण म्हणजे या निवडणुकीत 14 टक्के मतदान कमी झालं होतं. त्याचाच फायदा धीरज लिंगाडे यांना झालाय.