Amravati BJP-Congress | अमरावतीत भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली, भूमिपूजनाचा वाद; आजी-माजी आमदार समोरासमोर

धामणगावचे आमदार प्रताप अडसड म्हणाले, गेल्या 15 वर्षांपासून काय झालं ते आपण पाहिलं आहे. गाडी हळूहळू चालवावी लागली. रस्ते खराब आहेत. आता फलक प्रोटोकालनुसार लागतील, असं पालकमंत्र्यांनी सांगितलं आहे.

Amravati BJP-Congress | अमरावतीत भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली, भूमिपूजनाचा वाद; आजी-माजी आमदार समोरासमोर
माजी आमदार वीरेंद्र जगताप व भाजप आमदार प्रताप अडसड Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 5:19 PM

अमरावती : जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात (Dhamangaon Railway Assembly) विकास कामाच्या मुद्यावर भाजप काँग्रेसमध्ये जुंपली आहे. विकासकामाचे भूमिपूजन करण्यासाठी अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर (Guardian Minister Yashomati Thakur) धामणगाव मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत. मात्र काल रात्रीला भूमिपूजनाचे फलक अज्ञातानी तोडले. मात्र, माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी हे कटकारस्थान भाजपकडून केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर भाजप आमदार प्रताप अडसड यांनी देखील वीरेंद्र जगतापवर (Virendra Jagtap) निशाणा साधला आहे. गेल्या 15 वर्षात झालेली विकासकामे पालकमंत्री महोदयांनी पहिली आहेत. अशी टीका केली आहे. एकंदरीत धामणगाव विधानसभेत भाजप काँग्रेसचा वाद चव्हाट्यावर आला आहे.

माजी आमदार म्हणतात, कामं मी मंजूर केली

माजी आमदार वीरेंद्र जगताप म्हणाले, मी आमदार असताना या रस्त्यांची कामं मंजूर केली होती. पण, कोरोनामुळं कामं झाली नव्हती. अशावेळी झालेले हे विकासकाम आहेत. आम्हाला न बोलावता विकासकामांचं भूमिपूजन आमदारांनी केलं होते. त्यामुळं पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्याचं ठरविलं. रात्री अज्ञात व्यक्तींनी बोर्ड तोडले. पळपूटेपणाचे कृत्य केलं. आमच्या जिल्हा परिषद अध्यक्षांचं नाव टाकलं नव्हतं. त्यामुळं आम्ही जशास तसं उत्तर दिलं.

माजी आमदार भूमिपूजनासाठी हपापलेले

धामणगावचे आमदार प्रताप अडसड म्हणाले, गेल्या 15 वर्षांपासून काय झालं ते आपण पाहिलं आहे. गाडी हळूहळू चालवावी लागली. रस्ते खराब आहेत. आता फलक प्रोटोकालनुसार लागतील, असं पालकमंत्र्यांनी सांगितलं आहे. माजी आमदार भूमिपूजनासाठी हपापले आहे. पदासाठी सत्तालोलूप आहेत. त्यांच्या आरोपात काही तथ्य नाही. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं. यामुळं वातावरण खराब होण्याची शक्यता आहे, असं पोलीस अधीक्षक यांच्याशीही बोलण झाल्याचं अडसड यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.