Amravati Crime | कंत्राटदारास काढायचे होते कामाचे बिल, अभियंत्यासह लिपिक अडकले एसीबीच्या जाळ्यात

अमरावतीमध्ये एका कंत्राटदारास कामाचे बिल काढायचे होते. त्यासाठी त्याला अभियंत्याने लाचेची मागणी केली. कंत्राटदाराने एसीबीकडे तक्रार केली. या प्रकरणात अभियंता आणि लिपिक एसीबीच्या जाळ्यात अडकले.

Amravati Crime | कंत्राटदारास काढायचे होते कामाचे बिल, अभियंत्यासह लिपिक अडकले एसीबीच्या जाळ्यात
अमरावती येथील अभियंता, लिपिक एसीबीच्या जाळ्यात.Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 11:16 AM

अमरावती : अमरावतीच्या सार्वजनिक बांधकाम (Public Works) (आदिवासी) विभागाच्या एका कार्यकारी अभियंत्यासह वरिष्ठ लिपिकास रंगेहाथ अटक करण्यात आली. एका बांधकाम कंत्राटदाराचे कामाचे बिल काढून दिल्याच्या मोबदल्यात लाच मागितली होती. अभियंता सुनील रामदास कळमकर व वरिष्ठ लिपिक राजेश जनार्दन गुडधे अशी अटक करण्यात आलेल्या लाचखोरांची नावे आहेत. या प्रकरणातील तक्रारकर्ते यांचे मामा शासकीय कंत्राटदार (Government Contractor) आहेत. त्यांनी केलेल्या एका कामाचे बिल काढून दिल्याच्या मोबदल्यात कार्यकारी अभियंता सुनील कळमकर (Engineer Sunil Kalmakar) यांनी 50 हजार व वरिष्ठ लिपिक राजेश गुडधे यांनी 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

एसीबीच्या पथकाने रचला सापळा

यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल सायंकाळी कार्यालयातच सापळा रचला. यावेळी तक्रारकर्त्याच्या मामाकडून 50 हजारांची लाच स्वीकारताना कार्यकारी अभियंता सुनील कळमकर व पाच हजारांची लाच स्वीकारताना वरिष्ठ लिपिक राजेश गुडधे यांना रंगेहाथ अटक केली. अमरावतीमध्ये एका कंत्राटदारास कामाचे बिल काढायचे होते. त्यासाठी त्याला अभियंत्याने लाचेची मागणी केली. कंत्राटदाराने एसीबीकडे तक्रार केली. या प्रकरणात अभियंता आणि लिपिक एसीबीच्या जाळ्यात अडकले.

चंद्रपूरच्या मनपा आयुक्तांचा बंगला सील! जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर कारवाई, आयुक्तांवर बेघर होण्याची वेळ?

नागपुरात त्रिकोणी कुटुंबाचा दुःखद अंत, पत्नी आणि मुलीची हत्या करुन पतीने आयुष्य संपवलं

मनपा निवडणुका लांबणीवर! पाच राज्यांच्या निकालाने भाजप जोरात, काँग्रेसच्या उभेच्छुकांचा उत्साह मावळला?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.