महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी माझ्यावर दबाव; रवी राणांची ठाकरे सरकारवर टीका
कुठल्या ना कुठल्या पद्धतीने माझ्यावर दबाव आणून महाविकास आघाडीला मी मतदान करावे म्हणून माझ्यावर नोटीसीच्या माध्यमातून दबाव टाकला जात असल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर करण्यात आली आहे.
अमरावतीः नवनीत आणि रवी राणा (Navaneet Rana and Ravee Rana) यांचा आणि महाविकास आघाडीचा सुरू असलेला राजकीय वाद काही संपण्याची चिन्ह दिसत नाही. तो दिवसेंदिवस वाढतच जाताना दिसत आहे. आता नुकताच रवी राणा यांनी राज्ससभेच्या (Rajyasabha) निवडणुकीविषयी त्यांनी सांगितले की, मला राज्यसभा निवडणूकीच्या तोंडावरच न्यायालयात (Court) हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे ही गोष्ट चुकीची असून ठाकरे सरकार सत्तेचा गैरवापर करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
अमरावतीत बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा वापर करत आहेत.
महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी दबाव
कुठल्या ना कुठल्या पद्धतीने माझ्यावर दबाव आणून महाविकास आघाडीला मी मतदान करावे म्हणून माझ्यावर नोटीसीच्या माध्यमातून दबाव टाकला जात असल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर करण्यात आली आहे.
दबावाला बळी पडणार नाही
लोकसभा निवडणुकीसंदर्भात वेगवेगळे उमेदवार अनेक आमदारांना भेटत असतात, त्याच प्रमाणे मलाही आणि माझ्या अपक्ष आमदारांसोबत होत असलेल्या भेटी थांबवण्यासाठीच दबाव येत आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्यसभा निवडणुकीविषयी बोलताना आणि उमेदवारीविषयी सांगताना त्यांनी सांगितले की, ‘मी कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही, त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार पराभूत होणार आहे, आणि भाजपचा उमेदवार निवडून येईल ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचे त्यांनी सांगत आपण राजकीय पक्षांना बळी पडणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सत्तेचा गैरवापर करत आहे
उद्धव ठाकरे सरकार आपल्या सत्तेचा गैरवापर करत असून या सगळ्या गोष्टींचा त्यांना उत्तर मिळणार आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.