प्रशासकीय यंत्रणा सरकारच्या तालावर नाचते, हे मी म्हणत नाही तर… एकनाथ खडसे यांनी सांगितलं
रवी राणा यांना हे सिद्ध करून दाखवावं लागेल. खरोखरचं 50 कोटी घेतले की, नाही घेतले.
अमरावती : आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यामधील वाद विकोपाला गेला आहे. बच्चू कडू हे रवी राणा यांच्या विरोधात 50 कोटींचा दावा ठोकणार आहेत. दोन्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. यावर एकनाथ खडसे म्हणाले, मला वाटतं बच्चू कडू यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. 50 कोटींचा दावा म्हणजे 50 खोक्यांचा दावा आहे. यानिमित्तानं दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे. खरोखर घेतले की, नाही घेतले, असं मत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलंय.
रवी राणा हे आरोप करताहेत. तर रवी राणा यांना हे सिद्ध करून दाखवावं लागेल. खरोखरचं 50 कोटी घेतले की, नाही घेतले. हा वाद विकोपाला गेल्यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेला लक्षात येईल. खरोखरचं कुणी किती पैसे घेतले, असंही खडसे यांनी स्पष्ट केलं.
विरोधकांना नाउमेद करणं, विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करणं, विरोधकांचा आवाज बंद करणं हे सध्या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. प्रशासकीय यंत्रणा ही सरकारच्या तालावर नाचते आहे. असं जजमेंट पुण्याच्या कोर्टानं दिलं. पुण्याच्या न्यायालयानं म्हंटलं की, पोलीस प्रशासन यंत्रणा या कुण्यातरी व्यक्तीच्या तालावर नाचते आहे.
या यंत्रणांनी त्यांच्या कर्तव्याशी प्रामाणिक राहायला पाहिजे. पण, प्रशासन कर्तव्याशी प्रामाणिक न राहता कुण्या एका व्यक्तीच्या तालावर नाचते. अशा स्वरुपाचे ताशेरे पुण्याच्या कोर्टानं ओढले आहेत, असं खडसे यांनी सांगितलं.
आता मी म्हणत नाही. प्रशासकीय यंत्रणा ही सरकारच्या तालावर नाचते, हे आता कोर्ट म्हणतोय. ही अत्यंत नामुष्कीची बाब आहे. जेव्हा न्यायालय तुमच्यावर ताशेरे ओढते. यामुळं यावर अधिक कामेंट करण्याची आवश्यकता नाही, असं एकनाथ खडसे म्हणाले.
सुरक्षा कुणाला आवश्यक आहे कुणाला नाही, हा सरकारचा मूल्यमापनाचा प्रश्न आहे. याबद्दल तक्रार करण्याची गरज नाही. आवश्यकता असेल तर सुरक्षा दिली पाहिजे नसेल तर सुरक्षा काढली पाहिजे.