Amravati Crime | माजी नगरसेवकाच्या मुलावर चाकूने जीवघेणा हल्ला, चांदुररेल्वेतील तहसील कार्यालयासमोरील घटना, मारेकरी पसार
ही घटना चांदुररेल्वे शहरातील आहे. आर्यन हा माजी नगरसेवकाचा मुलगा चायनीज खाण्यासाठी तहसील कार्यालयासमोर गेला होता. चायनीज खात असताना अचानक त्याच्यावर हल्ला करण्यात आला. धारदार चाकूने वार करण्यात आले. या हल्ल्यात आर्यन जखमी झाला.
अमरावती : चांदुररेल्वे शहरात माजी नगरसेवकाच्या मुलावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. चांदुर रेल्वेच्या मुख्य रस्त्यावरील तहसील कार्यालयासमोरील (office) ही घटना आहे. 11 जूनला रात्री 8 वाजता दरम्यानची ही घटना आहे. या हल्ल्यात माजी नगरसेवक यांचा आर्यन कलावटे मुलगा गंभीर जखमी झालाय. आर्यन हा तहसील कार्यालयासमोर चायनीज खाण्यासाठी गेला होता. अचानक त्याच्यावर धारदार चाकूने (knife) वार करण्यात आल्याची माहिती आहे. हल्ला (assault) केल्यानंतर मारेकरी पसार झालेत. आर्यन गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. प्रकृती गंभीर होत असल्याने त्याला अमरावती हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. सद्या पोलीस मारेकरूंचा शोध घेत आहेत.
काय आहे प्रकरण
ही घटना चांदुररेल्वे शहरातील आहे. आर्यन हा माजी नगरसेवकाचा मुलगा चायनीज खाण्यासाठी तहसील कार्यालयासमोर गेला होता. चायनीज खात असताना अचानक त्याच्यावर हल्ला करण्यात आला. धारदार चाकूने वार करण्यात आले. या हल्ल्यात आर्यन जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्यानं त्याला अमरावती येथे हलविण्यात आले आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाले. या आरोपींचा शोध घेऊन अटक करण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे.
नेमकं काय घडलं
आर्यन हा चायनीज खात होता. त्याच्यासमोर चाकू घेऊन आरोपी आले. सपासप वार करू लागले. काय घडलं हे त्याला समजलंच नाही. आर्यन रक्ताच्या थारोड्यात खाली पडला. बाजूच्या नागरिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. वार करून आरोपी पसार झाले. प्रकृती गंभीर असल्यानं आर्यनला अमरावती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हल्ला करण्यामागचे कारण काय
आर्यनवर हल्ला कुणी केला. हल्ला करण्यामागचं कारण काय हे अद्याप स्पष्ट व्हायचं आहे. याचा तपास पोलीस करत आहेत. आर्यनचा जीव वाचविणे महत्वाचे आहे. त्याच्या वडिलांशी बोलल्यानंतरच संशयित आरोपी कोण असू शकतात, याचा अंदाज येण्याची शक्यता आहे.