Amravati | पिसाळलेला कुत्रा शोधा, 1 लाखाचं बक्षीस मिळवा; अमरावतीत बळवंत वानखडेंनी कुणावर केली बोचरी टीका?

अचलपूर दगडफेक प्रकरणावरून भाजपच्या पदाधिकाऱ्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर काँग्रेसकडून भाजपवर चौफेर हल्ले चढविले जात आहेत. विशेषतः माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे.

Amravati | पिसाळलेला कुत्रा शोधा, 1 लाखाचं बक्षीस मिळवा; अमरावतीत बळवंत वानखडेंनी कुणावर केली बोचरी टीका?
दर्यापूर मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडेImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 1:40 PM

अमरावती : अमरावतीच्या अचलपूरमध्ये दंगलीनंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरू झालं आहे. भाजपचे माजी कृषिमंत्री अनिल बोंडे (Former Agriculture Minister Anil Bonde) यांनी या दंगलीमागे यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांचा हात असल्याचे म्हटल्यानंतर काँग्रेसने देखील प्रतिउत्तर दिलं. दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे (Congress MLA Balwant Wankhade) यांनी थेट बोंडे यांना पिसाळलेला कुत्रा आणून द्या आणि एक लाख रुपये बक्षीस मिळवा, असे थेट आव्हानचं केलं आहे. त्यामुळं अनिल बोंडे यांची चांगलीच गोची झाली आहे. अचलपूर दगडफेक प्रकरणावरून अनिल बोंडे यांच्यावर चौफेर टीका होत आहे. एकीकडं यशोमती ठाकूर यांनी बोंडे यांचा खरपूस समाचार घेतला. दुसरीकडं

काँग्रेसकडून चौफेर हल्ला

अचलपूर दगडफेक प्रकरणावरून भाजपच्या पदाधिकाऱ्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर काँग्रेसकडून भाजपवर चौफेर हल्ले चढविले जात आहेत. विशेषतः माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. अनिल बोंडे हे दंगली पसरवितात, असा आरोप पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केला. त्यानंतर काँग्रेसचे पदाधिकारीही पुढं आले. या सर्वांनी अनिल बोंडे यांच्यावर चौफेर हल्ला चढविला आहे.

तरुणांना बिघडवू नका

अमरावती जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अमरावतीतील सुजाण नवतरुणांना बिघडवण्याचा प्रयत्न करू नका. आम्हाला भारताला सुपर पॉवर झालेले बघायचे आहे, असे आवाहन तिवसा विधानसभा मतदारसंघ युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षा आकांक्षा ठाकूर यांनी केले आहे. भाजपचे माजी आमदार अनिल बोंडे यांनी स्वतःच्या मुलांना परदेशात पाठवून इथल्या तरुणांची माथी भडकवण्याचे काम करू नये. आम्हाला येथे शांतता आणि प्रगती हवी आहे. आम्हाला भारताला सुपर पॉवर झालेले बघायचे आहे. भारताचा हॅपिनेस इंडेक्स वाढलेला बघायचे आहे. आम्हाला शांततेत जगू द्या आणि अमरावतीच्या आणि राज्याच्या विकासाला हातभार लागू द्या असे आवाहन ठाकूर यांनी केले आहे.

Gondia Crime | धक्कादायक! गोंदियात अर्धनग्न अवस्थेत तरुणीचा मृतदेह, चेहरा जाळून ओळख मिटविण्याचा प्रयत्न

Devendra Fadnavis: राऊतांनी वारंवार विदर्भात यावं, त्यांना सुबुद्धी सूचेल, देवेंद्र फडणवीसांचा चिमटा

Video Samrudhi Highway | उद्घाटनापूर्वीच आशिष देशमुख यांनी समृद्धी महामार्गावरून चालविली कार, समृद्धीवरील प्रवासाने वादाची शक्यता

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.