अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आदिवासी तरुण मासेमारी करत होता. वनविभागात नियमानुसार मासेमारी करता येत नाही. एक आदिवासी तरुण मासेमारी (fishing) करताना वनकर्मचाऱ्यांना दिसला. त्यामुळं वनकर्मचाऱ्यांना राग आला. त्यांनी त्या तरुणासोबत अतिशय क्रूरतेने वागणूक दिली. या वन कर्मचाऱ्यांनी गरम लोखंडी सळईने चटके दिल्याचा आरोप आदिवासी तरुणानं केला आहे. या प्रकारनं आदिवासींमध्ये खळबळ माजली. ही जनावरांसारखी शिक्षा (punishment) देण्याचा अधिकार (rights) वनकर्मचाऱ्यांना कुणी दिला. असा आरोप आता आदिवासी संघटनांकडून केला जातोय. त्यामुळं वनकर्मचाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. या प्रकरणी पोलीस काय कारवाई करतात, हे पाहावं लागले.
धारणी येथील धुळघाट रेल्वेचा अंकुश मावस्कर असं या आदिवासीचं नाव आहे. अंकूश तलावात मासेमारी करत होता. हा तलाव जंगलात येतो. त्यामुळं जंगलातील तलावात नियमानुसार मासेमारे करता येत नाही. पण, आदिवासींसमोर दुसरं काही पर्याय नसल्यानं तो लपून चोरून मासेमारी करत होता. हीच बाब वनकर्मचाऱ्यांना खटकली. ते स्वतःला जंगलाचे मालक समजू लागले. त्यामुळं त्यांनी लोखंडी सळईने चटके दिल्याचा आरोप आता आदिवासींकडून केला जातो.
अंकुशच्या शरीरावर लोखंडी सळईचे चटके बसलेत. त्यामुळं त्याच्या शरीराची आग होत आहे. हे प्रकरण समोर येताच अंकुशला रुग्णालयात दाखल करण्यात आले. वनकर्मचारी चांगलेच हादरले. आता या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. त्यानंतर नेमकं काय घडलं हे समोर येईल. हे सात ते आठ वनकर्मचारी यात सहभागी असल्याची माहिती आहे. त्यामुळं या वनकर्मचाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चौकशीनंतर दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आदिवासी संघटनांनी केली आहे.