खुर्ची हल्ला प्रकरणात नवनीत राणांनी घेतलं उद्धव ठाकरेंचं नाव; म्हणाल्या…

Navneet Rana on Daryapur Sabha Rada : अमरावतीच्या सभेत राडा झाला. माजी खासदार नवनीत राणा यांच्यावर काल दर्यापूरच्या सभेत खुर्च्या भिरकावण्यात आल्या. आहेत. या प्रकरणी आता गुन्हा दाखल झाला आहे. नवनीत राणा यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर...

खुर्ची हल्ला प्रकरणात नवनीत राणांनी घेतलं उद्धव ठाकरेंचं नाव; म्हणाल्या...
नवनीत राणाImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Nov 17, 2024 | 2:05 PM

एकाही हल्लेखोरांना सोडणार नाही असं पोलिसांनी सांगितलं आहे. मी शांत होते तरी देखील मला बघून काही लोकं आक्षेपार्ह घोषणाबाजी करत होते. मार देंगे काट, देंगे म्हणत होते. काही लोकांनी माझ्यावर थुकंन्याचा प्रयत्न केला. मारहाणीमध्ये माझ्या अंगरक्षकाला खुर्ची लागल्या. त्यांची भाषा कापण्याची असेल तर आमचीही तशीच राहील आम्ही शांत बसणार नाही. कोणी एका गालावर मारेल तर आम्ही दोन मारेल आता हिंदू शांत बसणार नाही. खल्लार गाव हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या तालुकाध्यक्षच गाव आहे, असं नवनीत राणा म्हणाल्या.

अँट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या सभेत राडा प्रकरणाला आता नवं वळण आहे. आरोपीवर नवनीत राणा यांना जीवानिशी मारण्याचा प्रयत्न तसेच अँट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल झालेत. आतापर्यंत 4 हल्लेखोरांना अटक तर फरार आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना झालं आहे. काल रात्री नवनीत राणा यांच्या प्रचार सभेत खुर्च्याची फेकाफेक करून तुफान राडा झाला होता.

अभिजीत अडसूळ काय म्हणाले?

शिवसेना शिंदे गटाचे नेते अभिजीत अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्या प्रचार सभेत राडा प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. अशा प्रकारच्या घटना दुर्दैवी आहे त्या घडू नये. पण नेहमी नवनीत राणा सोबत हे का घडतं हा प्रश्न आहे. नवनीत राणा यांचे उमेदवार घाबरले आहे ते चिंतेत आहे. मतांचं ध्रुविकरण करण्यासाठी आणि जातीमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी हा नवनीत राणा यांचा डाव आहे, असं अभिजीत अडसूळ म्हणालेत.

अमरावतीच्या दर्यापूरमधील खल्लार गावात माजी खासदार नवनीत राणा यांची सभा आयोजित करण्यात आली होती. युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदीले यांच्या प्रचारासाठी करण्यासाठी जाहीर सभेचे आयोजन आलं होतं. ही प्रचार सभा सुरु असतानाच मोठा राडा झाला. सभेसाठी आलेल्या काही लोकांनी खुर्च्या फेकत धुडगूस घातला. नवनीत राणा यांनी त्यांच्या अंगावर खुर्च्या फेकण्यात आल्याचा आरोप केला. पोलिसांनी या प्रकरणात 45 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. चार जणांना ताब्यात घेतलं आहे.

भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.