जुनी इमारत पाडण्यासाठी चारदा नोटीस, मालकाकडून दुर्लक्ष, अखेर इमारत पाडताना सहा जण दबले
मोहम्मद आरिप शेख रहीम, रिजवान शहा शरीफ शहा, मोहमद कमर, देवा व रवी परमार दुकान मॅनेजर अशी मृतकांची नावं आहेत. तर राजू कदम जखमी आहे.
अमरावती : प्रभात सिनेमाजवळील दुमजली शिकस्त इमारत कोसळली. त्यात पाच मजुराचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी आहे. महापालिकेने चार वर्षांपूर्वीच व्यावसायिक दुकाने असलेली ती इमारत अतिशिकस्त म्हणून पाडण्याचे निर्देश संबंधिताला दिले होते. ही इमारत अतिशिकस्त आहे, असे फलकदेखील लावण्यात आले होते. दोन-तीन दिवसांपासून ती इमारत पाडण्याचे काम सुरु होते.
आज 1 च्या सुमारास इमारत पाडत असताना इमारतीचा पहिला माळा अचानक कोसळला. त्यात चार ते पाच मजूर दबल्याची भीती सुरुवातीला व्यक्त करण्यात आली. महापालिकेची यंत्रणा पोहोचण्यापूर्वी लोकांनी स्वतःच कुदळे फावडे घेऊन मदत कार्य सुरू केले. सुमारे 2 च्या सुमारास महापालिकेची अग्निशमन व आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी पोहोचली.
पाच जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. मृतांमध्ये राजदीप एम्पोरियमचे व्यवस्थापक रवी परमार यांच्यासह तिघांचा समावेश आहे. कदम नावाचा व्यक्ती जखमी अवस्थेत सापडला. अपघातात किरकोळ बचावले.
ही इमारत खूप जुनी आणि जीर्ण होती. बऱ्याच दिवसांपासून वरच्या मजल्याचा वापर बंद होता. खालच्या मजल्यावर अनेक दुकाने होती. इमारत कोसळण्याचा धोका फार पूर्वीपासून होता. पालिकेने यापूर्वीच इमारत रिकामी करण्याची नोटीस दिली होती.
मोहम्मद आरिप शेख रहीम, रिजवान शहा शरीफ शहा, मोहमद कमर, देवा व रवी परमार दुकान मॅनेजर अशी मृकांची नावं आहेत. तर राजू कदम जखमी आहे.
अतिशय शिकस्त इमारत असल्याच्या चारदा नोटीसा या बिल्डिंग मालकाला देण्यात आली होती, अशी माहिती आहे. मात्र नोटीस दिल्यानंतर सुद्धा बिल्डिंग पाडल्या जात नव्हती. खाली केली जात नव्हती. महापालिका त्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई करत नाही. त्यामुळे मनपाचे या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते.
बिल्डिंग मालकाला किती नोटीस देण्यात आल्या होत्या, याची चौकशी करावी लागेल, नेमकं दोषी कोण ठरते त्यानुसार पुढील कारवाई करता येईल. असं मत अमरावती जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी व्यक्त केले.
इमारत शिकस्त होती. यापूर्वी सुद्धा बिल्डिंग मालकाला चार वेळा नोटीसा देखील देण्यात आल्या होत्या. मात्र बिल्डिंग खाली केली गेली नसल्याचं उपयुक्त भाग्यश्री बोरेकर यांनी सांगितलं.
अमरावती शहरात अनेक शिकस्त अशा इमारती आहेत. मनपाकडून त्यांना नोटीस दिल्या जातात. मात्र इमारती खाली केल्या जात नाही किंवा पाडल्या जात नाही. खरंतर इमारत खाली करून घेण्याची जबाबदारी देखील मनपाची असते. मात्र तशी कारवाई मनपाकडून केली जात नाही. आता या झालेल्या घटनेला जबाबदार नेमकं कोण यावर प्रश्नचिन्ह आहे.