अमरावतीत उन्हाचा कडाका वाढला; गेल्या 15 वर्षातील सर्वोच्च तापमानाची नोंद, शाळेच्या वेळेत बदल
अमरावती जिल्ह्यात (Amravati district) ऊन चांगलेच तापू लागले आहे. उन्हाच्या झळा अमरावतीकरांना बसत आहेत. मंगळवारी जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक 44. 1 अंश सेल्सिअस तापमानाची (Temperature) नोंद झाली आहे. वाढत्या उन्हामुळे शाळांच्या वेळेत देखील बदल करण्यात आला आहे.
अमरावती : अमरावती जिल्ह्यात (Amravati district) ऊन चांगलेच तापू लागले आहे. उन्हाच्या झळा अमरावतीकरांना बसत आहेत. मंगळवारी जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक 44. 1 अंश सेल्सिअस तापमानाची (Temperature) नोंद झाली आहे. गेल्या पंधार वर्षातील हे सर्वोच्च तापमान आहे. दरम्यान वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील शाळा (School)आता पूर्णवेळाऐवजी अर्धावेळच भरवण्यात येणार आहेत. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून अर्धवेळ शाळेचा निर्णय घेण्यात आला आहे. आज जिल्ह्याती जिल्हा परिषदेसह सर्व खासगी प्राथमीक आणि माध्यमिक शाळा पूर्ण वेळ न भरता सकाळी सात ते साडेअकरा पर्यंतच भरणार आहेत. कोरोना काळातील नुकसान भरून काढण्यासाठी शाळा एप्रिल महिन्यात देखील पूर्णवेळ सुरू ठेवण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाकडून घेण्यात आला होता. मात्र जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढल्याने, शाळा अर्धवेळच सुरू ठेवाव्यात अशी मागणी पालकांनी केली होती. अखेर पालकांची मागणी मान्य करत शाळांच्या वेळत आजपासून बदल करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला
जिल्ह्यात तापमान वाढत आहे. अमरावतीमध्ये गेल्या 15 वर्षांतील सर्वोच्च तापमानाची मंगळवारी नोंद झाली आहे. जिल्ह्यात मंगळवारी तब्बल 44. 1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वाढत्या उन्हामुळे सकाळी 9 नंतर नागरिकांना घराच्या बाहेर पडणे कठीण होत आहे. नागरिक अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडत आहेत. उत्तर भारतातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे तापमानात वाढ झाली असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे. दरम्यान ऊन वाढत असून, वाढत्या उन्हापासून बचावासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे तसेच काम असेल तरच घराच्याबाहेर पडा असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.
कोरोना काळात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी पूर्णवेळ शाळा
देशासह राज्यात गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकट होते. कोरोना काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. कोरनामुळे झालेले विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी शाळा पूर्णवेळ भरवण्यात याव्यात असे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आले होते. मात्र जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढत असल्याने शाळा अर्धवेळच भरवण्यात याव्यात अशी मागणी पालकांनी केली होती. अखेर पालकांची मागणी मान्य करत जिल्ह्यात शाळा अर्धवेळच भरवण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून अमरावती जिल्ह्यात घेण्यात आला आहे.
संबंधित बातम्या
पेट्रोल, डिझेल दर वाढीसोबतच पुणेकरांना महागाईचा आणखी एक झटका; सीएनजीच्या भावात वाढ
Pune Crime | ‘आमच्या गॅंगसोबत का राहत नाहीस?’ पुण्यात तरुणाला मारहाण करणारा गुंड जेरबंद
Pune metro : मेट्रो स्थानके होणार अस्सल पुणेरी; स्थानकांवर प्रतिबिंबित होईल पुण्याची ओळख!