अमरावती : विदर्भात (Vidarbha) पावसानं चांगलीच हजेरी लावली. त्यातच्या त्यात अमरावती जिल्ह्यातल्या शिरजगावात (Shirajgaon) मूसळधार कोसळला. काल दिवसभर पाऊस धो-धो बरसला. ढगफुटी सदृश्य परिस्थिती गावात निर्माण झाली. त्यामुळं गावाशेजारील तलाव, नाले भरले. नद्यांमध्ये पाणी वाहू लागले. एवढंच काय तर गावातील रस्त्यांवर तुडूंब पाणी वाहू लागले. घरांमध्ये पाणी शिरले. रस्त्यावर ठेवलेल्या गाड्या वाहून गेल्या. चालायच्या रस्त्यांवर गावात गुडघाभर पाणी वाहत होते. काहींच्या घरातील भांडीकुंडी या रस्त्यावरील पाण्यानं वाहूनं नेली. या जोरदार पावसानं नागरिकांची (Citizen) चांगलीच तारांबळ उडाली. रस्त्यावरील गाड्या सांभाळताना कसरत करावी लागत होती. पाण्यासाठी असलेले पाईपलाईन काही ठिकाणी फुटली. गावातील नाल्या चोक झाल्या होत्या.
कसबा गावातील नाले तुडूंब भरून वाहू लागले. ही पावसाची सुरुवात आहे. जिथं पाऊस बरसतो, तिथं नदी-नाल्यांना पूरसदृश्य परिस्थिती सुरू झाली आहे. या पावसानं साप सुरक्षित मार्ग शोधण्यासाठी घरांचा आश्रय घेताना दिसले. त्यामुळं भीती आणखीनच वाढली. लहान मुलं रस्त्यावर खेळू शकत नाही. असा प्रयत्न करणारे रस्त्यानं वाहून जाताना दिसले. गावकऱ्यांना त्यांना सुरक्षित बाहेर काढले. आपआपल्या दुचाकी सुरक्षित ठेवताना नागरिकांची दमछाक होत होती. दुचाकाची रस्त्यावरील पाण्यात वाहून जात असताना एका व्यक्तीला सांभाळेना, अशी परिस्थिती होती. दुचाकी सांभाळण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीची मदत घ्यावी लागत होती.
बाजार समितीत विकण्यासाठी शेतमाल ठेवण्यात आला होता. त्या शेतमालाची धूळधाण होताना दिसली. तुरी ओल्या झाल्या. त्यांना आता कोंब फुटतील. मग, त्या खरेदी कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला. पोत्यांमध्ये असलेला माल खराब झाला. ताडपत्रीनं झाकून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, तो अपुरा पडला. उघड्यावर असलेल्या धान्याची नासाडी झाली. चन्याला कोंब फुटले. तेही खराब झाले. पहिलाच पाऊस पाहून नागरिक घाबरले. आणखी किती जोराचा पाऊस येणार. ही ढगफुटी तर नाही, अशी भीती नागरिकांमध्ये पसरली आहे.