Navneet Rana | शरद पवारांच्या आशीर्वादामुळेच मी इथं, नवनीत राणा यांनी पवारांवर उधळली स्तुतीसुमने

नवनीत राणा या खासदार आहेत. पण, यापूर्वीच्या निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर लढविल्या. त्यामुळं शरद पवारांमुळं मी इथं आहे, असं नवनीत राणा म्हणाल्या. सध्या राणा या भाजपशी जवळीक साधून आहेत. असं असलं तरी पवारांच्या अमरावती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलंय.

Navneet Rana | शरद पवारांच्या आशीर्वादामुळेच मी इथं, नवनीत राणा यांनी पवारांवर उधळली स्तुतीसुमने
खासदार नवनीत राणा यांनी शरद पवार यांच्यावर उधळली स्तुतीसुमने Image Credit source: facebook
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 12:50 PM

नागपूर : अमरावतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांचा आज दौरा आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळलीत. शरद पवार या महाराष्ट्रचे ग्रेट लीडर (Great Leader of Maharashtra) आहेत. सगळे जण त्यांना पाहून आपल्या राजकारणाची सुरवात करतात. मला ही त्यांनी आशीर्वाद दिला आहे. मी त्यांची ऋणी आहे. त्याच्याच आशीर्वाद मुळं मी इथं आहे. आम्ही त्यांचं अमरावती कराच्या वतीने स्वागत करणार आहोत. मी त्यांच्या कार्यक्रमाला जाणार आहे. पवार साहेब जिथं जातात त्या सगळ्या बाजू भारी असतात. हे महाराष्ट्रानं पाहिलं आहे, असंही नवनीत राणा म्हणाले.

राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने लढविली निवडणूक

2014 आणि 2019 ची निवडणूक नवनीत राणांनी राष्ट्रवादीचं समर्थन घेऊन लढविली. शरद पवार यांनी नवनीत राणा यांच्यासाठी निवडणुकीत प्रचारसभा घेतल्या होत्या. निवडून आल्यानंतर नवनीत राणा या भाजपच्या समर्थक झाल्या. असं असलं तरी त्यांनी आज शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. शरद पवार हे अमरावती येथे राष्ट्रवादीच्या विभागीय मेळाव्यासाठी रवाना झाले आहेत. थोड्याच वेळात मेळाव्याला सुरुवात होणार आहे. या मेळाव्यात शरद पवार काय बोलतात. याकडं सर्वांच लक्ष लागलं आहे. कार्यकर्त्यांमध्ये बळ निर्माण करण्यासाठी तसेच राष्ट्रवादी विदर्भात मजबुत करण्यासाठी हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. नवनीत राणा या खासदार आहेत. पण, यापूर्वीच्या निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर लढविल्या. त्यामुळं शरद पवारांमुळं मी इथं आहे, असं नवनीत राणा म्हणाल्या. सध्या राणा या भाजपशी जवळीक साधून आहेत. असं असलं तरी पवारांच्या अमरावती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलंय.

नागपुरातही पवारांचे जल्लोषात स्वागत

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सकाळी दहा वाजता नागपूर विमानतळावर उतरले. कार्यकर्त्यांनी पवार यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर पवार अमरावतीच्या दिशेने रवाना झाले. पवारांच्या सुरक्षेसाठी सहा जिल्ह्यातील पोलीस अमरावतीत दाखल झाले आहेत. अमरावती शहरात अकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर ग्रामीण येथील पोलीस दाखल झाले आहेत. अमरावतीत 15 पोलीस निरीक्षक, 40 पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह 350 पोलीस तैनात आहेत.

सुरक्षेची काळजी घेतली जाईल

रवी राणा म्हणाले, याठिकाणी शरद पवार यांचं स्वागत आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण हा सगळ्यात आनंदाचा क्षण आहे. दोन दिवसांपूर्वीची घटना ही महाराष्ट्राला गालबोट लावणारी होती. संपूर्ण जिल्ह्याच्या वतीनं पवार यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल.

Video Sharad Pawar | शरद पवार यांचे नागपुरात जल्लोषात स्वागत, विमानतळावर कार्यकर्त्यांची गर्दी, अमरावतीच्या दिशेने रवाना

Nagpur Vaccination | नागपूर मनपा क्षेत्रात लसीकरण, 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Buldana Jobs | रोजगार निर्मितीत बुलडाणा जिल्हा विदर्भात अव्वल, 10 लाख रोजगाराच्या संधी केल्या उपलब्ध

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.