हिंसेची माहिती देण्यात इंटेलिजन्स फेल गेलं; अमरावती हिंसेवर यशोमती ठाकूर यांची कबुली
यशोमती ठाकूर म्हणाल्या, अमरावती शहरात मोर्चाला परवानगी दिली नव्हती. मोर्चाची परवानगी नाकारली होती. या ठिकाणी इंटेलिजन्स फेल झालं. का झालं यांचं आश्चर्य आहे. कोणी अधिकारी जबाबदार असेल तर कारवाई करणार असल्याचं त्या म्हणाल्या.
अमरावती : शहरातील हिंसाचाराची माहिती देण्यात इंटेलिजन्स फेल गेलं, अशी कबुली मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. इंटेलिजन्स फेल गेलं त्याची चौकशी झालीच पाहिजे. मी कारवाईचा आग्रह धरला आहे. पत्रं तयार आहे. कॅबिनेटमध्ये पत्रं देऊन चर्चा करणार, असं आश्वासनंही ठाकूर यांनी दिलंय.
यशोमती ठाकूर म्हणाल्या, अमरावती शहरात मोर्चाला परवानगी दिली नव्हती. मोर्चाची परवानगी नाकारली होती. या ठिकाणी इंटेलिजन्स फेल झालं. का झालं यांचं आश्चर्य आहे. कोणी अधिकारी जबाबदार असेल तर कारवाई करणार असल्याचं त्या म्हणाल्या.
रझा अकादमी आणि कट्टरपंथीयांचा फायदा कुणाला होत असतो हे हिंदुस्थानाला माहीत आहे. मला बोलण्याची गरज नाही. ज्या गोष्टी हिंसा निर्माण करतात ज्या संस्था सपोर्ट करतात, जे लोक हिंसक बोलतात त्यांच्यावर कारवाई केली आहे. ज्यांनी उद्या काही हिंसा भडकवली तर त्यांच्यावरही कारवाई करू. कुणालाही सोडणार नाही, असंही यशोमती ठाकूर म्हणाल्या.
फडणवीसांनी केला होता ठाकूर यांना सवाल
देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीतील पत्रकार परिषदेत बोलताना यशोमती ठाकूर आपली मतं कमी होणार म्हणून बोलत नाहीत का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर यशोमती ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांना प्रत्युत्तर दिलंय.
दोन्ही समाजातील लोकांवर कारवाई व्हायला हवी. एकाच बाजूच्या लोकांवर कारवाई का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर दोन्ही बाजूच्या लोकांवर कारवाई होत, असल्याचं स्पष्टीकरण यशोमती ठाकूर यांनी दिलं. तसेच समाजात शांतता निर्माण करणं आवश्यक आहे. आता शांत झालेल्या अमरावतीला भडकवू, नका, असा सल्लाही यशोमती ठाकूर यांनी फडणवीस यांना दिला.
अमरावती तणावासंदर्भात दोन्हीकडच्या लोकांवर कारवाई होत आहे. अर्धवट माहितीमुळे वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी थोडा संयम बाळगायला हवा, असा सल्ला राज्याच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला. फेसबुकवरही यशोमती ठाकूर यांनी यासंदर्भातील पोस्ट केली आहे.