Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amravati Marbat : इळा पिळा घेऊन जागे मारबत, अमरावतीत पीपीई किट घातलेल्या मारबतचे विसर्जन

यंदा शेतीतील टाकाऊ साहित्यांचा कल्पकपणे वापर करून सहा फुटांची मारबत तयार करण्यात आली. आखीवरेखीव चेहरा, साज शृंगार केलेली मारबतची मिरवणूक शहरातून निघाली. शेवटी ऐतिहासिक लालपूर येथे विसर्जन करण्यात आले.

Amravati Marbat : इळा पिळा घेऊन जागे मारबत, अमरावतीत पीपीई किट घातलेल्या मारबतचे विसर्जन
अमरावतीत पीपीई किट घातलेल्या मारबतचे विसर्जनImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 10:18 AM

अमरावती : विदर्भात काल बैलपोळा साजरा करण्यात आला. आज सकाळी मारबत काढण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर रायपुरा (Achalpur Raipura) येथील युवा गणेश मंडळाच्या वतीने अनोखी मारबत काढण्यात आली. पीपीई किट घातलेल्या मारबतला कोरोना घेऊन जा गे म्हणत विसर्जन (Visarjan) करण्यात आले. यासह ग्रामीण भागात विविध ठिकाणी मारबत काढण्यात आली. इळा पिळा घेऊन जागे मारबत… रोग राई घेऊन जागे मारबत… म्हणत मारबत माताला साकळ घालण्यात आले. मारबत मिरवणुकीवर यंदा विविध भ्रष्ट मंत्र्यांच्या बडग्यांसह महागाई, रस्त्यांवरील खड्डे आणि कोरोना, डेल्टा प्लस (Delta Plus) इतरही समस्यांचा प्रभाव दिसून आला. शिवाय, स्वदेशी बचाव विदेशी हटावो, प्रदूषण आणि रोगमुक्त शहरासाठी आदी विषयांवर पोस्टर तयार करण्यात आले होते.

शहरातून काढण्यात आली मारबतीची मिरवणूक

समाजातील अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करण्याच्या हेतूने तान्हा पोळ्याच्या दिवशी सकाळी ही मिरवणूक काढण्यात येते. अचलपूर येथील श्री युवा गणेश मंडळ व इतर तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसादात दरवर्षी मारबत मिरवणूक काढण्यात येते. यंदा शेतीतील टाकाऊ साहित्यांचा कल्पकपणे वापर करून सहा फुटांची मारबत तयार करण्यात आली होती. आखीवरेखीव चेहरा, साज शृंगार केलेली मारबतची मिरवणूक शहरातून निघाली. शेवटी ऐतिहासिक लालपूर येथे विसर्जन करण्यात आले. यावेळी समाजातील रोगराई घेऊन जा इडा पिढा घेऊन जा म्हणत मारबत माताचे विसर्जन करण्यात आले. अशी माहिती कार्यकर्ते महेंद्र दंडाळे यांनी दिली.

ऐतिहासिक मारबत महोत्सवाला 138 वर्षांची परंपरा

नागपुरात आजच्या दिवशी म्हणजेच पोळ्याच्या पाडव्याला मारबत मोहोत्सवाची परंपरा आहे. या मारबत मोहोत्सवाला 138 वर्षे झाली आहेत. काळी आणि पिवळी अशा दोन मारबत म्हणजे प्रतिकात्मक पुतळे काढले जातात. पिवळी मारबतही समृद्धीची तर काळी मारबत ही नागपूरकर राजे भोसले घराण्यातील इंग्रजांना फितूर गेलेल्या बाकाबाईचा निषेध म्हणून काढली जाते. याशिवाय वर्षभरात सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर भाष्य करणारे प्रतिकात्मक बडगे म्हणजे पुतळे काढले जातात. शहरातील प्रमुख भागातून ही मारबत आणि बडग्यांची मिरवणूक निघते. ही मारबत मिरवणूक बघण्यासाठी नागपूरच्या कानाकोपऱ्यातून नागरिक एकत्रित येतात.

हे सुद्धा वाचा

करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल.
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?.
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?.
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?.
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?.