Amaravati Crime : अमरावतीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल
धामणगाव रेल्वे तालुक्यातील दत्तापुर पोलिस स्टेशनअंतर्गत ही घटना घडली असून परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. 45 वर्षीय आरोपी प्रदीप भोकरे याने संधी साधून अल्पवयीन पीडितेला आपल्या गाडीवर बसवले आणि नंतर तिला फूस लावली. तिला गाडीवरून गावी सोडतो असे सांगितले आणि तिच्याशी तो चाळे करू लागला.
![Amaravati Crime : अमरावतीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल Amaravati Crime : अमरावतीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/02/17080332/Nagapur-Crime.jpg?w=1280)
अमरावती : अमरावती जिल्ह्यामध्ये अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न जैसे थे आहे. येथील दत्तापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एका मुलीवर अल्पवयीन मुली (Minor Girl)चा विनयभंग (Molestation) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रदीप भोकरे असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने अल्पवयीन मुलीला फूस लावून गाडीवरून पळवून नेले व नंतर तिच्याशी लैगिक चाळे केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी दत्तापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील अल्पवयीन मुली आणि महिलांच्या बाबतीत विनयभंग, लैगिक अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यात पोलीस यंत्रणांना यश कधी मिळणार, असा सवाल सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे. (Molestation of a minor girl in Amravati; Filed a case against the accused)
गाडीवरून गावी सोडतो असे सांगून पीडित मुलीशी चाळे
धामणगाव रेल्वे तालुक्यातील दत्तापुर पोलिस स्टेशनअंतर्गत ही घटना घडली असून परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. 45 वर्षीय आरोपी प्रदीप भोकरे याने संधी साधून अल्पवयीन पीडितेला आपल्या गाडीवर बसवले आणि नंतर तिला फूस लावली. तिला गाडीवरून गावी सोडतो असे सांगितले आणि तिच्याशी तो चाळे करू लागला. यादरम्यान घाबरून गेलेल्या पिडीत मुलीने गाडीवरून उडी मारून आपली सुटका करून घेतली. नंतर पीडित मुलीने तिच्याबाबतीत घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर लगेचच नातेवाईकांनी दत्तापुर पोलीस स्टेशन गाठले आणि याबाबत पोलिसांत रीतसर तक्रार दिली.
काही दिवसांपूर्वी खोलापूर परिसरात अल्पवयीन मुलीला अत्याचार
दत्तापुर पोलिसांनी विनयभंगाच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहेत. काही दिवसांपूर्वी खोलापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतही दुसऱ्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडली होती. ती घटना ताजी असतानाच दत्तापुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अल्पवयीन मुलीच्या बाबतीत विनयभंगाचा प्रकार घडला आहे. मुलीने वेळीच स्वतःची सुटका करण्यात यश मिळवली. त्यामुळे अतिप्रसंगाची घटना टाळता आली.
गेल्या वर्षभरात अत्याचाराच्या 19 तर विनयभंगाच्या 74 घटना
गेल्या वर्षी पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या ग्रामीण भागात 2020-21 मध्ये अत्याचाराच्या 19 घटना घडल्या तर विनयभंगाच्या 74 गुन्ह्यांची नोंद झाली होती. चालू वर्षातही तेच सत्र सुरु राहिल्याने अमरावती जिल्ह्यातील अल्पवयीन मुली असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Molestation of a minor girl in Amravati; Filed a case against the accused)
इतर बातम्या