अमरावती : दर्यापूर तालुक्यातील घोंशी धरणात(Ghonshi Dam) बुडून मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अमरावतीत घडली आहे. प्रिया गौरव तायडे(24) (Priya Gaurav Tayade) असे मयत महिलेचे नाव आहे. तर प्रियाचा पती गौरव तायडे याला वाचवण्यास बचाव पथकाला यश आले आहे. गौरव, प्रिया आणि त्यांची 3 वर्षाची मुलगी तिघेही धरणाजवळून जात असताना पाय घसरुन धरणात पडले. धरणावरील सुरक्षारक्षकाने ही घटना पाहिल्यानंतर त्याने तात्काळ तेथील भोई समाजातील लोकांना याची माहिती दिली. भोई समाजाच्या लोकांनी तात्काळ घटनास्थळी धाव गौरव तायडे सुखरुप बाहेर काढले. मात्र प्रिया आणि 3 वर्षाच्या चिमुरडीचा बुडून मृत्यू झाला. बचाव पथकाने दोघींचेही मृतदेह बाहेर काढले. मात्र प्रियाच्या माहेरच्या लोकांनी गौरवने मारण्याच्या उद्देशाने पत्नी आणि मुलीला पाण्याच ढकलले असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सध्या अपघाताची मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास करीत आहेत. (Mother and daughter drown in Ghonshi dam in Amravati)
गौरव आणि प्रिया यांचा चार वर्षापूर्वीच विवाह झाला होता. दोघांना एक तीन वर्षाची मुलगी आहे. गौरव आणि प्रिया यांचे वैवाहिक जीवन फारसे चांगले नव्हते. दोघांमध्ये नेहमी कौटुंबिक वाद होत होते. मात्र वादाचे नेमके कारण समजू शकले नाही. घटनेच्या दिवशी हे तिघेही नातेवाईकांच्या घरुन धामोडी पारद येथे आपल्या घरी परतत होते. मात्र ते दर्यापूर तालुक्यातील घोंशी धरणावर गेले. तेथे त्यांचा पाय घसरुन ते धरणात पडले. याप्रकरणी प्रियाच्या नातेवाईकांनी मात्र हा घातपात असल्याचे म्हटले आहे. याबाबत पोलीस प्रियाचा पती गौरव आणि प्रत्यक्षर्शी सुरक्षारक्षक यांची सखोल चौकशी करीत आहेत. पोलीस तपासानंतरच सत्य काय ते कळेल.
अचलपूर तालुक्यातील बोर्डी गावातील बेपत्ता असलेल्या मुलाचा मृतदेह आज एका शेतातील विहिरीत आढळून आला. वेदांत सुरेश तट्टे असे मयत मुलाचे नाव असून तो इयत्ता दहावीत शिकत होता. वेदांत हा 2 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 वाजता घरातून निघून गेला तो पुन्हा घरी परतलाच नाही. घरच्यांनी आजूबाजूला जाऊन पाहिले असता कुठे दिसला नाही. त्यानंतर नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध केली. मात्र वेदांतचा थांगपत्ता लागत नव्हता. आज दुपारी एका शेतात ओलितासाठी गेलेल्या मजुराला दुर्गंधी येऊ लागल्याने त्याने विहिरीत डोकावून पाहिले असता वेदांतचा मृतदेह दिसला. त्याने तात्काळ याची माहिती गावकरी आणि पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलीस ही हत्या आहे, आत्महत्या की अपघात ? याचा तपास करीत आहेत. (Mother and daughter drown in Ghonshi dam in Amravati)
इतर बातम्या
Gondia Accident | लग्नाची तारीख ठरवून गावी निघाले, पण वाटेतच होत्याचं नव्हतं झालं! तिघे ठार