नाव बच्चू पण, मी आरपार करू शकतो, आमदार कडू यांचा इशारा कुणाकडं

आपली धाव रुग्णालयाकडं असली पाहिजे, असंही बच्चू कडू म्हणाले.

नाव बच्चू पण, मी आरपार करू शकतो, आमदार कडू यांचा इशारा कुणाकडं
बच्चू कडू यांनी सांगितलं Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Oct 30, 2022 | 7:06 PM

अमरावती : प्रहारच्या वतीनं अमरावतीत रक्ततुला कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बच्चू कडू यांच्या वजनाऐवढे रक्त जमा करण्यात आले. बच्चू कडू म्हणाले, मी जाणाऱ्याचा राग करत नाही. येणाऱ्याचं खूप स्वागत करत नाही. नाव बच्चू असंल तर आडनाव कडू आहे हे लक्षात घ्या. गुवाहाटीला जाण्याचा निर्णय कडू होता. पण, तो गोड करणं आमच्या हाती आहे. निर्णय कडू असू शकतं पण, ते गोड करता आलं पाहिजे. काही निर्णय कडू घ्यावे लागतात, असंही ते म्हणाले.

काही निर्णय जाहीर करताना कडू असतात. सत्ता घेणारे सत्ता घेतात. आम्ही काय वेडे आहोत का, आम्हालाही डोकं आहे. काही लोकं म्हणतात, तुम्ही आंदोलनचं करायला पाहिजे. मी आंदोलन करतो. तू आलू बोंडे खात जा. हा कुठला धंदा आहे, असंही बच्चू कडू यांनी ठणकावलं.

आम्ही भगतसिंगाचे विचार घेऊन जातो. रक्तदान निस्वार्थ काम आहे. सामान्य माणसाचं काम केलं पाहिजे. माझं नाव बच्चू. पण, मी आरपार करू शकतो, असा इशारा त्यांनी दिला. नावात काही नाही. भाषणात नावं घेतलं म्हणजे गेम लागते, असं समजून घ्या. नावात काही नाही.

प्रत्येक तालुक्यात जिल्हा परिषदेची एक शाळा आदर्श करू. या शाळेच्या विचारावर जावं लागेल. एक वर्ग चांगलं करा. रंगरंगोटी करा. असं आवाहन त्यांनी प्रहारच्या कार्यकर्त्याला दिलं. सगळ्यांची ओढ मंदिर, मशिद पुतळ्यांकडं आहे. पण, आमची ओढ जिल्हा परिषदेची शाळा चांगली करण्याकडं आहे, असं त्यांनी सांगितलं. इंग्रजी शिकविणारा चांगला पोरगा असतो. त्याला चार हजार रुपये दिले तरी तो चांगलं काम करू शकतो.

आपली धाव रुग्णालयाकडं असली पाहिजे, असंही बच्चू कडू म्हणाले. जातीसाठी आणि मातीसाठी लोकं भांडत असतात. सेवेसाठी भांडणारा असा प्रहार आहे, असं त्यांनी जाहीर सभेत सांगितलं.

पॉलिथीन हातात राहत होती. तिथंच प्रहारचं कार्यालय सुरू झाला. या कार्यालयाचा व्याप राज्यभर पसरतोय. कोणत्याही रंगाचा झेंडा नव्हता. हिरवा, निळा, भगवा, यापैकी कोणताही झेंडा माझ्याकडं नव्हता. झेंडा घेऊन आलं की, लोकं एकत्र येतात. एका जातीचं नाव घ्या. लोक जमा होतात. त्यासाठी वेळ लागत नाही. मंदिर, मशिद पाडण्यासाठी वेळ लागत नाही. जातीधर्माच्या नावावर लोकं एकत्र येतात.

अमरावतीच्या तिवसा शहरात प्रहारच्या कार्यकर्त्यांचा स्नेहमीलन सोहळा झाला. प्रहरच्या 260 कार्यकर्त्यांनी रक्तदान केली. जमा झालेल्या रक्तातून करण्यात बच्चू कडू यांची रक्ततुला करण्यात आली. बच्चू कडू यांच्या वजनाच्या अधिक रक्त जमा झाले.

पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.